सांगोला तालुका

शिरभावी योजनेची ५४ ग्रामपंचायतीसह सहकारी संस्थांकडे १ कोटी १६ लाख ९५ हजार ४४९ रुपयांची थकबाकी

सांगोला -ऐन पावसाळ्यात सांगोला तालुक्याची वरदायनी असणाऱ्या शिरभावी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेतून सांगोला तालुक्यातील २६ गावांना मागणीनुसार सुमारे २५ लाख लिटर पाणीपुरवठा सुरू आहे तर नव्याने ७ गावांची मागणी वाढली आहे. शिरभावी योजनेची ५४ ग्रामपंचायतीसह सहकारी संस्थांकडे सुमारे १ कोटी १६ लाख ९५ हजार ४४९ रुपये इतकी थकबाकी आहे. संबंधित ग्रामपंचायत व संस्थांनी आपल्याकडील थकबाकी भरून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागास सहकार्य करावे असे आवाहन उपकार्यकारी अभियंता व ज्ञानेश्वर माने यांनी  केले आहे.
चालू वर्षी पावसाळा सुरू होऊन एक महिना उलटून गेला तरीही पावसाची चिन्हे दिसून येत नाहीत पाऊस लांबल्याने सांगोला तालुक्यातील नद्या नाले ओढे छोटे- मोठे तलाव, बंधारे कोरडे पडले आहेत तर गाव पातळीवरील ग्रामीण पाणी पुरवठ्याच्या विहिरीतील पाणीसाठा संपुष्टात येऊ लागला आहे. त्यामुळे गाव वाड्या वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे सांगोला तालुक्याची पिण्याच्या पाण्यासाठी वरदानी असलेल्या भावी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेकडे ग्रामपंचायतची पाणी मागणी वाढू लागली आहे सध्या ऐन पावसाळ्यातही तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीना त्यांच्या मागणीनुसार सुमारे २५ लाख लिटर पाणीपुरवठा सुरू आहे. पावसाने अशीच ओढ दिल्यास तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावे लागणार आहे त्यामुळे शिरभावी प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेची ज्या ग्रामपंचायतीकडे थकबाकी आहे अशा ग्रामपंचायतीने आपल्याकडील थकबाकी भरून पाणीपुरवठा सुरळीत करण्यास सहकार्य करावे. शिरभावी प्रादेशिक नळ पाणी पूरवठा योजनेची ५४ ग्रामपंचायतीकडे सुमारे १ कोटी ३ लाख ६९ हजार ४८६ रुपये तर चार सहकारी संस्थांकडे १३ लाख २५ हजार ९६३ रुपये असे एकूण सुमारे १ कोटी १६ लाख ९५ हजार ४४९ रुपये थकबाकी असल्याचे उपकार्यकारी अभियंता ज्ञानेश्वर माने यांनी सांगितले.
चौकट – ऐन पावसाळ्यात शिरभावी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेतून सांगोला तालुक्यातील संगेवाडी देवळे मांजरी बामणी वाकी शिवणे खवासपूर एखतपुर लोटेवाडी अचकदाणी सोनलवाडी वाणी चिंचाळे आलेगाव घेरडी मानेगाव डोंगरगाव सोनंद आगलावेवाडी बुरंगेवाडी  हनमंतगाव अजनाळे गोडसेवाडी राजापूर आदी ३ गावांसह २६ गावांना त्यांच्या मागणीनुसार पाणीपुरवठा सुरू आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!