सांगोला आगारातील सेवानिवृत्त कर्मचारी व शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ज. मौला तय्यब पठाण ( वय – ७२ ) यांचे बुधवार दि. २७ नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास निधन झाले आहे.
त्यांच्या पश्चात दोन भाऊ, तीन बहिणी, दोन मुले – सुना , दोन मुली- जावई, नातवंडे असा मोठा परिवार असून सर्फराज पठाण व प्रहार संघटनेचे पदाधिकारी, पत्रकार नविद पठाण यांचे ते वडील होत. त्यांचा तिसऱ्या दिवसाचा विधी (जियारत) शुक्रवार दि. २९ रोजी सकाळी ८ वाजता कबरीस्तान (जन्नतुल बकीह) सांगोला येथे होणार असल्याचे त्यांच्या नातेवाईकांकडून सांगण्यात आले आहे.