जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा सांगोला च्या शिक्षिका श्रीमती. शमीम महेमूद शेख मॅडम यांचा शाळा व्यवस्थापन समिती व माता पालक गटांच्या वतीने सत्कार.

सांगोला तालुका पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या वतीने दिला जाणारा यावर्षीचा 2023- 24 आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा सांगोला येथे शिक्षिका श्रीमती. शमीम महेमुद शेख मॅडम यांचा शाळा व्यवस्थापन समिती व माता पालक गटाच्या सौ. समरीन बागवान सौ. रूकैया बागवान सौ .परवीन बागवान सौ. नजीरुननिसा शेख यांनी शाल, श्रीफळ व फेटा देऊन त्यांचा सन्मान केला
त्यावेळी बोलताना अध्यक्ष आयाज हाजी इकबाल बागवान म्हणाले की शेख मॅडमचे काम उत्कृष्ट असून केलेल्या मेहनतीचे फळ आहे. त्यांना मिळालेला पुरस्कार हा योग्यच आहे सौ. रुकैया बागवान सौ. परवीन बागवान सौ. नजीरूनिसा शेख सौ. समरीन बागवान यांनीही शुभेच्छा देऊन अभिनंदन केले. सत्काराला उत्तर देताना श्रीमती. शमीम महेमूद शेख मॅडम म्हणाल्या की हा पुरस्कार म्हणजे तुमच्या सर्वांच्या सहकार्याने व मदतीने मिळालेला पुरस्कार असून यामध्ये सिंहाचा वाटा शाळा व्यवस्थापन समिती व माता पालक गटाचा आहे त्याबद्दल अध्यक्ष,उपाध्यक्ष, सर्व सदस्य, सर्व मातांचे त्यांनी आभार मानले.
सदर कार्यक्रम प्रसंगी शाळेतील उपशिक्षक श्री. अकलाकअहमद शेख श्री. फारुक भुसारी श्रीमती. शहनाज अत्तार मॅडम श्री. रावसाहेब सावंत सर श्रीमती. शहजादी मुलानी मॅडम,उपाध्यक्ष दिलावर बागवान उपस्थित होते.