सुमन महिला अबऺन को-ऑप क़ेडिट सोसायटीमध्ये स्व.डॉ गणपतरावजी देशमुख यांना अभिवादन

वाढेगाव येथील सुमन महिला अबऺन को-ऑप क़ेडिट सोसायटीमध्ये स्व.डॉ गणपतरावजी देशमुख यांना पुण्यतिथी अभिवादन करण्यात आले.,प्रतिमेचे पुजन बॅंकेचे सि. ई. ओ. मा. श्री. गणेश महादेव शिनगारे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक श्री. वसंत दिघे गुरुजी यांनी केले.
यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष तानाजी भोसले, संजय डोईफोडे, भारत हजारे, जोतिराम ऐवळे,रमेश हजारे, पत़कार विकास वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते भानुदास दिघे,बंडू माने, महेश आठवले,अध्यक्ष पोपट हजारे, दादा दिघे, ग़ा. पंचायत सदस्य मा. दत्तात्रेय शिनगारे महाराज,सुरवसे सर, राजुभाऊ ननवरे,सुनीलबापु वसमळे,इरफान मुलाणी, सुभाष कांबळे यांच्या ग्रामस्थ पुष्पवृष्टीस हजर होते.
प्रास्ताविकात भाई. गणपतरावजी देशमुख यांच्या कार्याची महती सांगत असताना सांगोला तालुक्याची चोहोबाजूंनी केलेली प़गती व पक्षनिष्ठा याबद्दल सांगितले. त्याचबरोबर बॅंकेचे सि. ई. ओ. गणेश शिनगारे यांच्या सामाजिक कार्याची माहिती दिली. महिलांना लाडकी बहिण योजनेसाठी लागणारे फाॅर्म व झेरॉक्स हे मोफत दिल्याबद्दल महिला वर्गात आनंदाचे वातावरण आहे असे मत व्यक्त केले.