बुरंगेवाडी(जवळा) येथील श्री.विठ्ठल नवत्रे यांचे निधन.
जवळा(वार्ताहर) बुरंगेवाडी(जवळा) तालुका सांगोला येथील श्री विठ्ठल बयाजी नवत्रे यांचे मंगळवार दि.21नोव्हेंबर रोजी सायं 7 वा 30 मिनिटांनी त्यांच्या राहत्या घरी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.
मृत्यूसमयी त्यांचे वय 75 वर्षे होते.श्री.विठ्ठल नवत्रे यांनी विद्या विकास मंडळ जवळे संचलित कै.सौ.वत्सलादेवी देसाई विद्यालय जवळे या प्रशालेमध्ये शिपाई या पदावर एकूण 42 वर्ष सेवा बजावली.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुले तीन विवाहित मुली, सुना, नातवंडे, परतवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या तिसऱ्या दिवसाचा विधी गुरुवार दिनांक 23 नोव्हें रोजी सकाळी 8 वाजता जवळा स्टेशन रोड कोरडा नदी येथे होणार असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.