महाराष्ट्र

स्पेक्ट्रम टॅलेन्ट सर्च राज्यस्तरीय परीक्षेत फीनिक्स प्रशालेतील विद्यार्थ्यांचे देदीप्यमान यश!

महुद बु॥: नुकत्याच जाहीर झालेल्या स्पेक्ट्रम टॅलेन्ट सर्च राज्यस्तरीय परीक्षेच्या निकालात फीनिक्स प्रशालेतील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश संपादन करत आपल्या बुद्धिमत्तेची चमक दाखवली आहे. अनेक विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकावले असून, इयत्ता – १ ली १) समृद्धी समाधान रेगूडे २ ) शिवम अंबादास रेगूडे . इयत्ता – २ री १ ) वेदश्री वैभव बाजारे २ ) श्रेयश सागर येडगे इयत्ता – ३ री . कुणाल मदने या विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळवत फिनिक्स प्रशालेचे नाव रोशन केले आहे.

यावर्षीची स्पेक्ट्रम परीक्षा विद्यार्थ्यांसाठी एक मोठी संधी होती आणि महुद मधील अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांनी यात सक्रिय सहभाग घेतला होता. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे यश लक्षणीय असून, योग्य मार्गदर्शन आणि कठोर परिश्रमाच्या बळावर त्यांनी हे यश संपादन केले आहे.

या यशाबद्दल बोलताना, एका यशस्वी विद्यार्थ्याच्या पालकांनी सांगितले, “आमच्या मुलाने खूप मेहनत घेतली होती आणि त्याला शाळेतील शिक्षकांचेही उत्तम मार्गदर्शन मिळाले. या यशाने त्याचा आत्मविश्वास खूप वाढला आहे.”

 ” स्पेक्ट्रम टॅलेंट सर्च राज्यस्तरीय परीक्षा विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक भावना निर्माण करतात आणि त्यांना अभ्यासासाठी प्रोत्साहित करतात. आमच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबदल संस्थेचे संस्थापक श्री येडगे सर व फ फ फीनिक्स प्रशालेचे मुख्याध्यापक श्री लवटे सर यांनी सर्व गुणवत्ताधारक विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचे कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button