आ.शहाजी बापू यांचा निश्चित विजय-खासदार श्रीकांत शिंदे

सांगोला विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार शहाजी बापू पाटील यांच्या प्रचारार्थ आज मतदारसंघात प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रॅलीला संपूर्ण सांगोला वासियांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दर्शविला. तर यानंतर महूद या गावी आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी आमदार शहाजी बापू पाटील, श्रीकांत देशमुख, शशिकांत देशमुख यांच्यासह शिवसेना व मित्र पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहुन सांगोला वासियांनी लोकप्रिय उमेदवार असलेले शहाजी बापू यांचा निश्चित विजय होणार असा विश्वास यावेळी दर्शविला.
मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने राज्याच्या शहरी तसेच ग्रामीण भागातही अनेक विकास कामे मार्गी लावली. याच अंतर्गत शहाजी बापूंच्या नेतृत्वात सांगोला विधानसभा मतदारसंघात ही अनेक विकासकामे मार्गी लागली. यामुळे आज सांगोला विधानसभेचे चित्र बदलत आहे. याच बरोबर आपल्या सरकारने महायुती सरकारच्या काळात शेतकऱ्यांसाठी, महिला – भगिनिंसाठी, युवा वर्गासाठी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या. यामुळे आज सर्व नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. तर आपल्या सांगोला विधानसभा मतदारसंघातील युवा वर्गाला हक्काचा रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी लवकरच येथे एमआयडीसीची स्थापना करण्यात येईल, असे मत यावेळी व्यक्त केले.या
मुळे सांगोला विधानसभेच्या विकासासाठी येत्या २० नोव्हेंबर रोजी धनुष्यबाण चिन्हा समोरील बटन दाबून शहाजी बापू पाटील यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्या, असे आवाहन यावेळी सर्वांना केले.
यावेळी सांगोला विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने सांगोला वासी उपस्थित होते.