सेवानिवृत्तीनंतर शिक्षकांनी समाजसेवेचा वसा अंगिकारावा – माजी प्राचार्य शंकरराव डोंबे; माणगंगा परिवाराच्या वतीने सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार संपन्न

सांगोला (प्रतिनिधी): सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांनी आदर्श समाजव्यवस्था व राष्ट्र उभारणीच्या कार्यात स्वतःला वाहून घ्यावे. शिक्षकांनी सेवानिवृत्तीनंतरही समाजाला दिशा देण्याचे काम करावे. तसेच सेवानिवृत्तीच्या नंतर सामाजिक कार्यात झोकून द्यावे. शिक्षकाचे कार्य हे भारतीय संस्कृतीमध्ये गेल्या अनेक पिढ्यापासून समाजामध्ये शिक्षकांना अत्यंत मानसन्मान दिला जातो. त्यामुळे शिक्षकांनी सेवानिवृत्तीचा काळ सामाजिक कार्यात झोकून देऊन कार्य करावे. शिक्षकाचे कार्य समाजाला दिशादर्शक असून उद्याची पिढी घडविण्यासाठी शिक्षक कायम प्रयत्नशील असतात. सेवानिवृत्ती नंतर शिक्षकांनी समाजसेवेचा वसा अंगिकारावा असे आवाहन माजी प्राचार्य शंकरराव डोंबे यांनी केले.
माणगंगा परिवार अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटीच्या वतीने सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य शंकरराव डोंबे तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य साजिकराव पाटील उपस्थित होते. माणगंगा परिवाराचे संस्थापक अध्यक्ष नितीन इंगोले, संचालक विवेक घाडगे, विजय वाघमोडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्राचार्य साजिकराव पाटील म्हणाले, शिक्षकांनी पुढची पिढी घडविण्याचे काम केले आहे. सेवानिवृत्तीनंतर आर्थिक साक्षरता आणि सजगता निर्माण व्हावी. बचत करण्यास प्राधान्य द्यावे असे आवाहन त्यांनी केले.
माणगंगा परिवार अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटीच्या वतीने सेवानिवृत्त झालेले उपमुख्याध्यापक लक्ष्मण विधाते, उपशिक्षक शंकर केदार, क्रीडा शिक्षक महादेव नरळे, पर्यवेक्षक पोपट केदार, पर्यवेक्षक अजय बारबोले, सहशिक्षक राजेंद्र जाधव, पंडित सुरवसे, गणित शिक्षक रावसाहेब भजनावळे, सहशिक्षक भारत दिघे, मुख्याध्यापक मनोहर इंगवले, मुख्याध्यापक शिवाजीराव कुंभार, ग्रंथपाल रघुनाथ सोळसे, नूतन मुख्याध्यापक विजयकुमार जगताप, एकनाथ फाटे, गणित शिक्षक आण्णासाहेब चौगुले, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त कांताराम बाबर, पर्यवेक्षक रफिक मणेरी, बाळासाहेब आयवळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पोपट केदार, रावसाहेब भजनावळे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक विवेक घाडगे यांनी केले.