महाराष्ट्र

सांगोला विद्यामंदिरमध्ये किशोरवयीन मुलींसाठी समुपदेशन पर व्याख्यान संपन्न

सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला येथे महिला दक्षता समिती व लायन्स क्लब ऑफ सांगोला यांचे संयुक्त विद्यमाने इयत्ता नववी ते बारावी मधील किशोरवयीन मुलींसाठी मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे स्नेहल चव्हाण (PSI सांगोला) ॲड.सुप्रिया बोत्रे डॉ. स्मिता गव्हाणे अध्यक्षस्थानी संस्था कार्यकारिणी सदस्या शीलाकाकी झपके तसेच सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य अमोल गायकवाड, उपमुख्याध्यापिका शहिदा सय्यद उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे पर्यवेक्षक उत्तम सरगर, सांगोला लायन्स क्लबचे अध्यक्ष ला.प्रा. नवनाथ बंडगर,सर्व महिला शिक्षिका तसेच नववी ते बारावी मधील सर्व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थित होते.
सर्वप्रथम उपमुख्याध्यापिका शहिदा सय्यद यांनी कार्यक्रमाचे महत्त्व सांगत सर्वांचे स्वागत केले.
या वेळी कु. स्नेहल चव्हाण यांनी किशोरवयीन मुलींसाठी पोक्सो कायदा, बाल विवाह कायदा, संरक्षण कायदा, निर्भया पथक याद्वारे स्वसंरक्षण करत निर्भीडपणे स्वतःच्या पायावर उभे राहावे असे सांगत भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

 

तसेच ॲड.सुप्रिया बोत्रे यांनी घरानंतर शाळा हे संस्काराचे मंदिर आहे. शिक्षणामुळे आपले भवितव्य उज्वल होते. प्रत्येक अडचणीवर मात करण्याची तयारी ठेवा. भरपूर कष्ट करा. स्वतःची स्पर्धा स्वतःशी करा. मोबाईलचा अनावश्यक वापर टाळावा असे सांगत मुलींना स्वसंरक्षणास महत्त्व देण्यास सांगितले. डॉ.स्मिता गव्हाणे मॅडम यांनी इयत्ता नववी ते बारावी मधील मुलींसाठी आरोग्य विषयक मार्गदर्शन केले मानसिक आणि भावनिक बदल कसे होत जातात. आहाराविषयी काळजी कशी घ्यावी. आठ ते चौदा वर्षातील बदल कशा पद्धतीने होतात हे विविध उदाहरणाच्या माध्यमातून विद्यार्थिनींना सांगितले.
अध्यक्षीय मनोगतातून संस्थेच्या कार्यकारिणी सदस्या शीलाकाकी झपके यांनी आपण विद्यामंदिरचे आदर्श विद्यार्थी आहोत आपले ध्येय उच्च असले पाहिजे याची जाणीव करून देत अभ्यासाचे महत्त्व सांगितले तसेच किशोरवयीन मुलींसाठी प्रबोधनपर ‘जरा जपून जपून’ ही कविताही सादर केली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.माधुरी केदार यांनी केले तर आभार उज्वला कुंभार यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button