डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर सदस्य म्हणून फॅबटेक टेक्निकल कॅम्पस ,कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चचे प्राचार्य डॉ.रवींद्र शेंडगे नियुक्ती करण्यात आल्याची माहिती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अरविंद किवळेकर यांनी जाहीर केले .
फॅबटेक अभियांत्रिकी महाविद्यालयातील संशोधन आणि विकास विभागास आर्थिक संसाधनांची भर पडणार आहे. तसेच विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती वाढविणे,त्यांच्या कल्पनांना वाव देणे व त्या सत्यात उतरवणे, नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी वित्तपुरवठ्याचे स्रोत वाढवण्याच्या दृष्टीने काम करणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ.रवींद्र शेंडगे त्यांनी दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर प्राचार्य डॉ.रवींद्र शेंडगे नियुक्ती झाल्याबद्दल फॅबटेकचे चेअरमन मा.श्री.भाऊसाहेब रुपनर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय अदाटे , कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.संजय बैस , डीन अँकँडमीक डॉ. शरद पवार , आय.क़्यु ए सी. चे डॉ.वागीशा माथाडा , फॅबटेक पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. तानाजी बुरुंगले आणि फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चे प्राचार्य प्रा.सिकंदर पाटील यांच्यासह सर्व विभागाचे विभागप्रमुख, प्राध्यापक ,शिक्षकेत्तर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.