*लायन्सकडून गरजूंना दारापर्यंत सेवा – ला.प्रा.प्रबुद्धचंद्र झपके*

सांगोला ( प्रतिनिधी ) हे कंकण करी बांधियले, जनसेवे जीवन दिधले या उक्तीप्रमाणे आंतरराष्ट्रीय लायन्स संघटना विविध क्षेत्रात समाजाच्या उन्नतीसाठी कार्यरत आहे.यानुसार सांगोला लायन्स क्लबकडून सांगोला व मंगळवेढा तालुक्यातील विविध गावांमध्ये गरजूंच्या दारापर्यंत मोफत नेत्र तपासणी शिबिराच्या माध्यमातून सेवा दिली जात आहे याचा लाभ घ्यावा असे प्रतिपादन ला.प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांनी केले.सांगोला लायन्स प्रथम उपाध्यक्ष समाजसेवक इंजिनियर ला.हरिदास कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त लायन्स क्लब ऑफ सांगोला आयोजित सांगोला लायन्स क्लब प्रथम उपाध्यक्ष, समाजसेवक ला. इंजि. हरिदास कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त लायस क्लब सांगोला आयोजित गुणाई डेअरी व श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन लायन्स आय हॉस्पिटल सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आलेगाव येथे मोफत डोळे तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर माजी सरपंच श्रीरंग बाबर, लायन्स झोन चेअरमन ला.प्रा.धनाजी चव्हाण, सांगोला लायन्स क्लब अध्यक्ष ला.उन्मेश आटपाडीकर, उपसरपंच राहुल ढोले, ग्रामपंचायत सदस्य सविता कांबळे, तात्यासो बाबर, सांगली आय हॉस्पिटलचे रियाज मुल्ला,इंजि.ला.हरिदास कांबळे ,गुणाई डेअरी चेअरमन ला.सौ.सुमन कांबळे उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रा.झपके यांनी वेळेत डोळे तपासणी व वेळेत उपचारासंदर्भात व शिबिराच्या माध्यमातून कमी खर्चात व मोफत शस्त्रक्रिया या संदर्भात मौलिक मार्गदर्शन केले.व आलेगावमधील शिबिराच्या आयोजनासाठी इंजि ला.हरिदास कांबळे व कुटुंबियांना धन्यवाद दिले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज ,महात्मा फुले ,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. व माजी सरपंच श्रीरंग बाबर यांचे हस्ते फीत कापून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
या शिबिरामध्ये एकूण १०० पेक्षा जास्त रुग्णांची डोळे तपासणी झाली .यामधून पाच रुग्ण मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी सांगली आय हॉस्पिटल कडे रवाना झाले.
शिबिरासाठी लायन्स क्लब ऑफ सांगोला लायन्स सचिव अजिंक्य झपके,जीएसटी चेअरमन ला.अमोल महिमकर सदस्य,ला.उमेश नष्टे,ला.सुर्यकांत कांबळे,गुणाई डेअरीचे पदाधिकारी व सदस्य, ग्रामपंचायत आलेगाव सदस्य, गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंजि.ला.हरिदास कांबळे यांनी केले सूत्रसंचालन ला.सुर्यकांत कांबळे तर कार्यक्रमाचे स्वागत व आभार प्रदर्शन श्वेताली कांबळे यांनी केले.
*चौकट* – समाजसेवक इंजि. हरिदास कांबळे,सौ.सुमन कांबळे व त्यांची कन्या श्वेताली कांबळे मुंबईहून आपल्या गावी येऊन. मागील तीन वर्ष वाढदिवसानिमित्त सांगोला लायन्स क्लबच्या माध्यमातून आलेगावमध्ये मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करून गावातील गरजूंना सेवा देऊन ग्रामीण भागातील रुग्णांना दिलासा देत आहेत.यासाठी त्यांचे कौतुक होत आहे.