रोटरी क्लब, सांगोला, महाराष्ट्र साहित्य परिषद, सांगोला, इनरव्हील क्लब ऑफ सांगोला व सांगोला अर्बन बँक यांच्या संयुक्त विद्यमाने सांगोल्यात उद्या कवी संमेलन 2025 च्या उंबरठ्यावर
सांगोला(प्रतिनिधी):-प्रजाकसत्ताक दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब, सांगोला, महाराष्ट्र साहित्य परिषद, सांगोला, इनरव्हील क्लब ऑफ सांगोला व सांगोला अर्बन बँक यांच्या संयुक्त विद्यमाने सद्य स्थितीवर आधारित भव्य कवी संमेलन उद्या रविवार दि. 26 जानेवारी 2025 रोजी आयोजित करण्यात आले आहे.
या कवी संमेलनाचे उद्घाटक प्रा. श्री. पी. सी. झपके सर, अध्यक्ष महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा सांगोला, कार्यक्रमाचे अध्यक्ष कवी ज्ञानेश डोंगरे व सूत्रसंचालन कवी सुनिल जंवजाळ हे आहेत. या कार्यक्रमामध्ये कवी शिवाजी बंडगर, कवी महादेव कांबळे, कवी गौसपाक मुलाणी, कवी प्रेमकुमार वाघमारे हे सहभागी होणार आहेत.
हा कार्यक्रम रविवार दि. 26 जानेवारी 2025 रोजी सांय. ठिक 5 वाजता हॅप्पी पार्क चौपाटी, वासुद रोड, सांगोला येथे होणार आहे. सदरचा कार्यक्रम सर्वासाठी खुला आहे. तरी सांगोला तालुक्यातील सर्व कवी प्रेमी रसिक प्रेक्षकांनी या कवी संमेलनांस आपली उपस्थिती नोंदवून अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.