सांगोला विद्यामंदिर मध्ये एस. एस. सी. बोर्ड परीक्षा मार्च 2024 मधील 64 गुणवंताचा सत्कार संपन्न

सांगोला:- मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या एस. एस. सी. बोर्ड परीक्षेमध्ये सांगोला विद्यामंदिर प्रशालेतील 64 विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा जास्त गुण मिळविले. यामधील 23 विद्यार्थ्यांनी 95% पेक्षा जास्त गुण मिळवून तर संस्कृत विषयामध्ये 08 विद्यार्थ्यांनी व गणित विषयामध्ये 03 विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 गुण मिळवून उज्वल यश संपादन केले. या कार्यक्रमामध्ये सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने 95 % पेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या 23 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 1000 रुपये याप्रमाणे रोख रक्कम 23 हजार रुपये बक्षीस रूपाने तसेच सन्मानचिन्ह देऊन सन्मानित केले.

 

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज, सांगोला येथे प्रमुख पाहुणे डॉ. शैलेश डोंबे व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांचे हस्ते संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर संस्था सचिव म.शं. घोंगडे, सेवानिवृत्त प्राचार्य गंगाधर घोंगडे, प्राचार्य अमोल गायकवाड, नाझरा विद्यामंदिर प्रशालेचे प्राचार्य बिभिषण माने, उपप्राचार्या सौ सय्यद मॅडम, पर्यवेक्षक सुरेश मस्तुद, मच्छिंद्र इंगोले, प्रदीप धुकटे उपस्थित होते.

 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थापक अध्यक्ष गुरुवर्य चं.वि.तथा बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास प्रमुख पाहुणे डॉ. शैलेश डोंबे यांच्या हस्ते पुष्पहार समर्पित करण्यात आला. त्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. शैलेश डोंबे यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगोला विद्यामंदिर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणारी अग्रेसर अशी शाळा आहे. विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न व कष्टाच्या माध्यमातून उज्वल यश संपादन करून आपल्या प्रशालेचे व आपल्या पालकांचे नाव उज्वल करावे असे विचार व्यक्त केले .

गुणवंत विद्यार्थी कुमार प्रणव पुजारी याने आमच्या यशामध्ये पालक व सर्व मार्गदर्शक शिक्षक यांचा मोलाचा वाटा आहे असे विचार व्यक्त केले. त्याचबरोबर पालक सौ स्वाती म्हमाणे यांनी विद्यार्थ्यांच्या यशामध्ये शिक्षकांचे प्रयत्न त्याचबरोबर वर्षभरामध्ये प्रशालेच्या माध्यमातून केले गेलेले प्रयत्न महत्त्वाचे आहेत असे विचार व्यक्त केले.

अध्यक्षीय भाषणात संस्थाअध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके सर यांनी आजच्या गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यातून इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी व चांगला अभ्यास करून यश मिळवावे तसेच इयत्ता दहावीचे वर्ष पुढील स्पर्धा परीक्षांचे प्रवेशद्वार आहे असे सांगितले. उज्वल यश संपादन करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्नांची गरज असते तसेच विद्यार्थ्यांनी भविष्यातील स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी कठोर परिश्रम करावे असे विचार व्यक्त केले. तसेच शाळेच्या यशस्वीतेचा इतिहास व परंपरा थोडक्यात सांगत ती कायम टिकविल्याबद्दल विद्यार्थी, शिक्षक व पालक यांचे अभिनंदन करून सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना सदिच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य अमोल गायकवाड यांनी केले. आभार प्रदर्शन पर्यवेक्षक सुरेश मस्तुद यांनी केले तर सूत्रसंचालन प्रशांत रायचुरे यांनी केले. शेवटी अल्पोपहार व चहापानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button