सांगोला इनरव्हील क्लबच्या अध्यक्षपदी सौ स्वाती अंकलगी आणि सेक्रेटरी पदी सौ पल्लवी थोरात यांची निवड
इनरव्हील क्लब ऑफ सांगोला यांची वार्षिक सर्वसाधारण सभा मावळत्या अध्यक्षा सौ सविता लाटणे यांच्या अध्यक्षतेखालीमोठ्या उत्साहात पार पडली. मागील वर्ष 2023 -24 चाआढावा घेऊन या सभेमध्ये 2024- 25 या वर्षाचे नवीन पदाधिकारी निवडण्यात आली.

अध्यक्ष म्हणून सौ स्वाती मकरंद अंकलगी तसेच सेक्रेटरी म्हणून सौ पल्लवी थोरात यांची निवड झाली. सौ सुजाता पाटील व्हाईस प्रेसिडेंट, सौ अनिता कमले ट्रेझरर ,सौ संगीता चौगुले आय एस ओ सौ, मंगल चौगुले एडिटर आय पी पी, सौ सविता लाटणे आदी पदाधिकाऱ्यांची निवड झाली.

निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे इनरव्हील क्लब कडून अभिनंदन करण्यात आले आणि नवीन वर्षाच्या कार्याबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या.