मोबाईल बंद पडला आणि बँक खात्यामधील रक्कम गायब

[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]

सांगोला:-  अज्ञात व्यक्तीने बैंक  खात्यावरून परस्पर दोन लाख ११ हजार ८३० रुपये काढून घेतले असल्याची घटना कोंबडवाडी (कोळे) (ता. सांगोला) येथे घडली आहे.

 

संपतराव बाबा कोळेकर (रा. कोंबडवाडी,कोळा ता. सांगोला) यांचा ट्रान्स्पोर्टचा व्यवसाय आहे. त्यांचे कोळे येथील एका बँकेत खाते आहे. या खात्यामध्ये कोळेकर यांच्या ट्रान्स्पोर्टच्या गाड्यांचे भाडे व अॅडव्हान्स रक्कम जमा होत होती. दरम्यान २१ मे रोजी कोळेकर यांचा मोबाईल बंद पडला. त्यांनी बंद पडलेला मोबाईल सुरू करण्याचा प्रयत्न केला पण तो सुरू होत नव्हता. त्यांनी दुसरे सीमकार्ड घेऊन मोबाईल सुरू करण्याचा प्रयत्न केला तरीही तो सुरू झाला नाही म्हणून त्यांनी त्यांचे शिक्षक भाऊ तानाजी कोळेकर यांच्याकडे गेले. तानाजी कोळेकर यांनी कस्टमर केअर सेंटरला फोन करून संपत कोळेकर यांचा मोबाईल कशामुळे बंद आहे

याबाबत तक्रार केली. त्यानंतर रात्री त्यांचा मोबाईल सुरू झाला. २६ मे रोजी कोळेकर यांच्या वाहनाचा विमा संपला होता. त्यामुळे विमा कंपनीस चेक द्यायचा असल्याने त्यांनी त्यांच्या खात्यावरील बॅलन्स चेक केला असता खात्यावर फक्त २२ रुपये शिल्लक असल्याचे दिसून आले. त्यांनी तत्काळ कोळे येथील  शाखेत जाऊन चौकशी केली असता २१ मे रोजी त्यांच्या खात्यावर २ लाख ११ हजार ८५२ रुपये होते, तर २२ मे रोजी मोबाईल बंद पडल्यानंतर ११ रुपये दोनदा कट झाले होते तर २३ मे रोजी १ लाख ९० हजार रुपये तसेच २४ व २५ मे रोजी उर्वरित रक्कम कट झाली होती.

त्यामुळे त्यांची खात्री झाली की त्यांच्या परवानगीशिवाय अज्ञात व्यक्तीने त्यांच्या खात्यातून दोन लाख ११ हजार ८३० रुपये रक्कम परस्पर ट्रान्स्फर करून घेतली आहे व आपली फसवणूक झाली आहे.

याबाबत संपतराव कोळेकर यांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button