कोळा अर्बन बँकेचे कार्य प्रेरणादायी ~ गृहसचिव अशोक नाईकवाडे
सांगोला येथे कोळा अर्बन बँकेला नाईकवाडे सदिच्छा भेट...

ग्रामीण भागातील व परिसरातील सर्वसामान्य लोकांना व्यापारी वर्गांना जनतेला गोरगरिबाला अडचणीच्या काळात नेहमीं मदतीचा हात देणारी सांगोला व कोळा पंचक्रोशीत प्रसिद्ध नावाजलेल्या कोळा कृषी सेवा अर्बन बँक लि सांगोला या शाखेला भेट देताना आनंद होत आहे संस्थेचे बँकिंग क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय प्रेरणादायी असल्याचे विचार महाराष्ट्र शासनाचे मंत्रालयातील गृह विभागाचे अव्वर सचिव अशोक नाईकवाडे साहेब यांनी व्यक्त केले.
सांगोला जिल्हा सोलापूर येथील कोळा कृषी सेवा अर्बन बँक लि सांगोला शाखा या संस्थेला मंत्रालयातील गृह विभागाचे अव्वर सचिव अशोक नाईकवाडे साहेब यांनी सदिच्छा भेट दिली याप्रसंगी मानाचा फेटा शाल श्रीफळ देऊन चेअरमन आप्पासाहेब सरगर यांच्या हस्ते सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला यावेळी सर्व संचालक कर्मचारी उपस्थित होते.
पुढे बोलताना गृहसचिव अशोक नाईकवाडे म्हणाले कोळा कृषी सेवा अर्बन बँक लि सांगोला शाखेचे उत्कृष्ट काम पाहून प्रभावित झालो माझा सत्कार केल्याबद्दल चेअरमन सर्व संचालक मंडळाला धन्यवाद देतो चेअरमन आप्पासाहेब सरगर व माझे गेल्या वीस वर्षापासून मैत्रीपूर्ण जिव्हाळ्याचे संबंध आहेत कोळ्या सारख्या ग्रामीण भागात संस्था उभा करून सांगोला शहरात दुसरी शाखा उभी करून एक चांगले गौरवास्पद काम केले आहे सहकार क्षेत्रातील काय अडचण असेल कोणतीही काम असेल तर कधीही कळवा सहकार्य निश्चित केले जाईल असे अशोक नाईकवाडे यांनी शेवटी सांगितले.
यावेळी जनरल मॅनेजर अनिल मोरे यांनी संस्थेचा कामकाजाचा कर्ज वाटप ठेवी याबाबत सविस्तर माहिती दिली.या कार्यक्रमास चेअरमन आप्पासाहेब सरगर व्हा चेअरमन काकासो नरळे माजी पंचायत समिती सदस्य सुभाष इंगोले, पत्रकार जगदीश कुलकर्णी,संचालक आकाराम बोधगिरे, आबा आलदर,शिवाजी घेरडे,बिरा आलदर, दगडू चौगुले, उत्तम आलदर ,बालाजी घोडके, शंकर कोळेकर, रामभाऊ खांडेकर, सुभाष केंगार, अंकुश आलदर यांच्यासह आदी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जनरल मॅनेजर अनिल मोरे शाखाधिकारी नंदकुमार घोडके, बाळासाहेब घेरडे, सागर शिंदे, पंढरी आलदर, लक्ष्मण घाडगे,केरू सुतार,तानाजी आलदर, सुभाष नरळे,वैभव सरगर यांनी परिश्रम घेतले.प्रास्ताविक चेअरमन आप्पासाहेब सरगर तसेच सर्वांचे आभार नंदकुमार घोडके यांनी मानले.