वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप; ओम शेंडे विद्यार्थ्याच्या वाढदिवसानिमित्त प्रशालेत उपक्रम

आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयातील विद्यार्थी ओम राहुल शेंडे या विद्यार्थ्याच्या वाढदिवस त्याच्या पालकांनी इतर खर्चाला छेद देत प्रशालेत विधायक उपक्रमांनी साजरा केला.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वतीच्या प्रतिमापूजनाने प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली. प्रशालेतील विद्यार्थ्यांना ओम शेंडे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करून प्रशालेतील विद्यार्थ्यांना शालेय वह्या, पेन, पेन्सिल संस्था सचिव विठ्ठलपंत शिंदे सर,सहसचिव नीलकंठ शिंदे सर,राहुल शेंडे, कोळेकर,अरुण बंडगर यांच्या हस्ते साहित्य वाटप करण्यात आले.
तसेच प्रशालेच्या प्रांगणात वाढदिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक रमेश पवार सर यांनी या उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या व सूत्रसंचालन सुवर्णा इंगवले मॅडम यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रशालेतील शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले