वैजिनाथ घोंगडे याना वसंतराव नाईक प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

 

सांगोला दि. २५ – वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्काराची सोमवार दि. २४ रोजी मुंबई येथे घोषणा करण्यात आली. त्यामध्ये माणगंगा भ्रमणसेवा संस्थेचे अध्यक्ष वैजिनाथ घोंगडे यांनी गेल्या दहा वर्षापासून माणगंगा संस्थेच्या वतीने सोलापूर, सांगली जिल्ह्यातील माणगंगा नदीवर केलेल्या कामाची नोंद घेऊन त्यांना जलसंधारण पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या १११ व्या जन्मदिनानिमित्त सोमवार दि. १ जुलै रोजी सायं. ५ वा. मुख्यमंत्री मा. ना. एकनाथ शिंदे, कृषी मंत्री मा. ना. धनंजय मुंडे तसेच राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांच्या शुभहस्ते व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण होणार आहे.

शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप असून सदर कार्यक्रम यशवंतराव चव्हाण केंद्र, जगन्नाथ भोसले मार्ग, मंत्रालयाजवळ मुंबई या ठिकाणी आयोजित केला आहे. राज्यातील दर वर्षी दिला जाणारा सन्मानाचा पुरस्कार असून पुरस्कार जाहीर झालेबद्दल अनेक संस्था, व्यक्तींकडून वैजिनाथ घोंगडे यांचे अभिनंदन केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button