सांगोला तालुक्यातील डोंगरगाव येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ डोंगरगाव यांच्या वतीने कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व ग्रामीण भागातील कलाकारांना स्वतंत्र व्यासपीठ मिळावे या उद्देशाने दिनांक 12/9/ 2024 वार गुरुवारी सायंकाळी ठीक 6.00 वाजता राज्यस्तरीय ग्रुप डान्स स्पर्धा व राज्यस्तरीय वैयक्तिक डान्स स्पर्धा चे आयोजन करण्यात आले आहे.
सदर स्पर्धेसाठी उद्घाटक म्हणून सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री भीमराव खणदाळे साहेब उपस्थित राहणार असल्याची माहिती मंडळाच्या वतीने देण्यात आलेली आहे सदर स्पर्धेतील प्रथम क्रमांकासाठी श्री. सुशांत सुभाष बाबर यांचेकडून रोख बक्षीस 11, 111 रुपये व ट्रॉफी, तर दुसरे माझी उपसरपंच श्री दिनकर शंकर कांबळे यांचेकडून रोख बक्षीस हे 7,777 रुपये व ट्रॉफी तर तृतीय बक्षीस हॉटेल यशोदीप आणि बिअर बार चे मालक श्री धनाजी शिवाजी बाबर यांचे कडून रोख बक्षीस 5,555 रुपये रोख व ट्रॉफी आणि उत्तेजनार्थ बक्षीस डोंगरगाव चे उपसरपंच श्री साहेबराव शिवाजी कदम यांचे कडून रोख 2,222 रुपये व ट्रॉफी देण्यात येणार असल्याचे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले तसेच वैयक्तिक राज्यस्तरीय डान्स स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक विजेत्या स्पर्धकांना विविध कार्यकारी सेवा सोसायटी डोंगरगावचे चेअरमन श्री विठ्ठल रामचंद्र खंडागळे यांचे कडून रोख 5000 रुपये व ट्रॉफी तर द्वितीय क्रमांकासाठी महात्मा फुले विद्यालय डोंगरगाव चे माजी मुख्याध्यापक श्री तात्यासो गोरख उतळे सर यांचे कडून रोख 3000 रुपये व ट्रॉफी , तृतीय क्रमांकासाठी डॉ. विक्रम सुरेश बाबर यांचे कडून रोख 2000 रुपये व ट्रॉफी आणि उत्तेजनार्थ क्रमांक मिळवणाऱ्या स्पर्धकाला विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे संचालक श्री माणिक गणपती गुरव यांचेकडून रोख 1000 रुपये व ट्रॉफी देण्यात येणार असल्याची मंडळाने जाहीर केलेली आहे.
सदर स्पर्धेसाठी ज्या स्पर्धकांना भाग घ्यावयाचा आहे त्यांनी आपली नावे ताबडतोब विक्रम किरगत 9730614386, सागर बाबर 8975212013 व दादासो बाबर 9765222950 यांचेकडे फोनवरून किंवा प्रत्यक्षात नोंद करावयाची आहेत.