महाराष्ट्र

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाला आकाश इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून मदत- डाॅ. अमित रूपनर*

फॅबटेक एज्युकेशन सोसायटी संचलित, फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी तसेच सांगोला परीसरातील विद्यार्थ्यांसाठी फॅबटेक संस्था आकाश इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाला मदत होईल असे मत फॅबटेक एज्युकेशन सोसायटीचे मॅनेजिंग डायरेक्टर डाॅ. अमित रूपनर यांनी व्यक्त केले.

     फॅबटेक टेक्निकल कॅम्पस सांगोला येथे बुधवार दिनांक २१ मे २०२५ रोजी आकाश इन्स्टिट्यूटच्या वतीने फॅबटेक संस्थेतील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

 यामध्ये वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग क्लासेस आणि अभ्यासक्रम कोर्सेस आकाश इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून मदत होणार आहे. एम एच टी सीईटी, आयआयटी-जेईई, आकाश इन्स्टिट्यूटचा उद्देश आहे की गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे. यासाठी सांगोला सारख्या ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षण देणारे व अल्पावधितच शैक्षणिक क्षेत्रातील नावलौकिक प्राप्त केलेल्या फॅबटेक टेक्निकल कॅम्पस मध्ये आकाश फाऊंडेशन आयोजित वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये ११ वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी पीसीएमबी आणि जेईई-मेन या परीक्षेचे कोर्सेस चालू करण्यात आले आहेत. या कोर्सेसचा विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन इस्टेट डायरेक्टर डाॅ. संजय आदाटे यांनी केले आहे.

    यादरम्यान फॅबटेक इंजिनिअरिंग प्राचार्य डाॅ. रविंद्र शेंडगे, उप-प्राचार्या डाॅ. विद्याराणी क्षीरसागर, पाॅलिटेक्निक इंजिनिअरिंग चे प्राचार्य तानाजी शेंडगे, पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य सिकंदर पाटील आदींसह कॅम्पस मधील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 या कार्यक्रमाचे सुञसंचलन प्रा. संजय देशमुख यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. चांडोले यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button