फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मधील विद्यार्थ्यांचे रंगोत्सव सेलिब्रेशन नॅशनल आर्ट कॉम्पिटिशन मध्ये उत्तुंग यश

फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित, फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी रंगोत्सव सेलिब्रेशन नॅशनल आर्ट कॉम्पिटिशन मध्ये उत्तुंग यश मिळवले. मानवी सर्जनशीलतेचा आविष्कार म्हणजे चित्रकला होय. विद्यार्थ्यी रंगोत्सव स्पर्धेत सहभागी होऊन उज्ज्वल यश मिळवले.
या पारितोषिक वितरण समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे चेअरमन श्री भाऊसाहेब रुपनर कॅम्पस डायरेक्टर डॉ.संजय अदाटे प्राचार्य श्री सिकंदर पाटील ए.ओ.वर्षा कोळेकर सुपरवायझर सौ वनिता बाबर हे लाभले. मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला. स्कूल मधून एकूण चौतीस विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल मिळाले, पंचवीस विद्यार्थ्यांना सिल्वर मेडल मिळाले, पंधरा विद्यार्थ्यांना ब्रांझ मेडल मिळाले ,पाच विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले,तर पाच विद्यार्थ्यांना सरप्राईज गिफ्ट मिळाले. तसेच चार शिक्षकांना सरप्राईज गिफ्ट व प्रशस्तीपत्रक तर अठरा शिक्षकांना सहभागी प्रमाणपत्र मिळाले.
रंगोत्सव स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल फॅबटेक पब्लिक स्कूल ला “बेस्ट स्कूल फॉर फ्युचरीस्ट अवॉर्ड” मिळाला. संस्थेचे चेअरमन श्री भाऊसाहेब रुपनर यांना “एज्युकेशन रिफॉर्मर अवॉर्ड” मिळाला तर स्कूलचे प्राचार्य श्री सिकंदर पाटील यांना “रिमार्केबल कॉन्ट्रीब्युशन अवॉर्ड” मिळाला तर स्कूलचे आर्ट टीचर श्री अविनाश जावीर सर यांना “कलारत्न अवॉर्ड” मिळाला विद्यार्थ्यांमध्ये स्माही उत्कर्ष घोंगडे या विद्यार्थिनीला ए ग्रेड मिळून स्केटिंग स्कूटर व ट्रॉफी मिळाली, तर प्राची सहदेव देसाई ला ए ग्रेड मिळून बुद्धिबळ पट व सिल्वर मेडल मिळाले. तर श्रेयश दत्तात्रय शिंदे या विद्यार्थ्याला ए ग्रेड मिळून आर्ट मेरिट अवॉर्ड व ट्रॉफी मिळाली, तर अनुष्का पुंडलिक जानकर हिला ए ग्रेड आर्ट मेरिट अवॉर्ड ट्रॉफी मिळाली तर वेदांत विशाल जुंदळे याला ए ग्रेड मिळून आर्ट मेरिट अवॉर्ड मिळाला, तर शाश्वत राहुल अवताडे या विद्यार्थ्याला ए ग्रेड मिळून आर्ट मेरिट अवॉर्ड व ट्रॉफी मिळाली. रंगोत्सव स्पर्धेसाठी कलाशिक्षक अविनाश जावीर सर यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन श्री भाऊसाहेब रुपनर मॅनेजिंग डायरेक्टर डॉ.अमित रुपनर एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर श्री दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ. संजय अदाटे , स्कूलचे प्राचार्य श्री सिकंदर पाटील यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ फरीदा मुलाणी यांनी केले या कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.