फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसीचे सुयश
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांचेकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी – २०२४ परीक्षेमध्ये फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसीच्या विदयार्थ्यानी यंदाही घवघवीत यश संपादन केले आहे. यामध्ये डि. फार्मसीच्या प्रथम वर्षामध्ये श्वेता बापु आसबे हीने प्रथम क्रमांक (77 30%), मोनाली कैलास कांबळे हीने दूसरा क्रमांक (79.00%) , पल्लवी दामाजी ठेगील हीने तिसरा क्रमांक (72.30%) तर वैष्णवी कैलास काळे हिने चौथा हंमाक (71.40%) तसेच सत्यजित सिधन्ना कोळी याने पाचवा क्रमांक (70.60%) मिळविला आहे.
डि- फार्म द्वितीय वर्षामध्ये सानिका सुनील खुळपे (85.36%) हीने प्रथम क्रमांक व पौर्णिमा केताराम घांची (84.64%) हीने दूसरा क्रमांक व संदेश शिवशरण (81.46%) याने तिसरा क्रमांक, साक्षी जनार्दन गोडसे (80.55%) हिने चौथा क्रमांक तर संध्या शिवाजी वाघमोडे (80.46%) हिने पाचवा क्रमांक मिळविला आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबददल व्यवस्थापकीय संचालक डॉ. अमित रूपनर, कार्यकारी संचालक श्री. दिनेश रूपनर व परिसर संचालक डॉ संजय अदाटे तसेच कॉलेजचे प्राचार्य डॉ संजय बैस व सर्व शिक्षक वृंद यांनी विदयार्थ्यांचे कौतुक केले.