sangola

सांगोला नगरपरिषद बुलेटिन जून -2024

HTML img Tag Simply Easy Learning    

◼राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत या आर्थिक वर्षामध्ये 12 बचत गटांना सवलतीच्या वार्षिक 4% व्याजदराने रक्कम रुपये 41 लाख इतक्या कर्जाचे वाटप शहरातील विविध बँकेच्या माध्यमातून करण्यात आले.

◼ नगरपरिषदेकडून स्थापन करण्यात आलेल्या नवीन 15 बचत गटांना भविष्यात व्यवस्थित प्रगती करण्याच्या दृष्टीने त्यांना दिनांक 19 व 20 जून 2024 रोजी राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत बचत गट संकल्पना प्रशिक्षण, वस्तीस्तर संघ व शहरस्तर संघ संकल्पना प्रशिक्षण, लेखा १ व २ प्रशिक्षण व नेतृत्व विकास प्रशिक्षण दिले गेले.

◼ राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळण्याच्या दृष्टीने जुलै महिन्यामध्ये बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन भरविणे नियोजित आहे.

◼देशातील प्रत्येक कुटुंबाला पक्के घर असायला हवे ह्या हेतूने शहरातील गरिबांसाठी “प्रधानमंत्री आवास(शहरी)” या योजनेची सुरुवात डिसेंबर 2015 रोजी करण्यात आली होती. केंद्र शासनाच्या या योजनेची सांगोले नगपरिषदे मार्फत प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे.
आजअखेर सांगोला शहरात एकुण २०३ घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले असून ४८ घरकूल पूर्णत्वास येत आहेत.
या योजनेत पात्र लाभार्त्याला स्वतःच घर बांधण्यासाठी राज्य शासनाचे 1 लाख व केंद्र शासनाचे 1.5 लाख असे एकूण 2.5 लाख वितरित करण्याची तरतूद आहे.
सांगोले नगरपरिषदेचा एकुण ५५ लाभार्त्यांचा ५ वा सविस्तर प्रकल्प अहवालास ऑक्टोबर २०२३ रोजी शासना कडून मंजुरी मिळालेली आहे.
राज्य शासनाचे १ लक्ष प्रमाणे अनुदान नगरपरिषदेस मंजुर झाले आहे. माहे जून २०२४ अखेर १३ पात्र लाभार्थ्यांना बांधकाम प्रगतीच्या टप्प्यानुसार १ लाख प्रमाणे अनुदान बँक खात्यावर जमा करण्यात आले आहे.

◼महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयान्वये महिलांना पुरुषांबरोबर समानतेची वागणूक देणेसाठी व समाजामध्ये महिलांप्रती सन्मानाची भावना निर्माण करण्यासाठी तसेच एकल पालक महिला यांची संतती यांना देखील समाजामध्ये ताठ मानाने जगण्यासाठी शासकीय दस्तऐवजांमध्ये दि.01/05/2024 नन्तर जन्म झालेल्या बालकाचे नाव आईचे नाव नंतर वडिलांचे नाव व आडनाव अशा स्वरुपात नोंदविण्याचे बंधनकारक करण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. त्यास अनुसरून जन्म -मृत्यू नोंदणी प्रणाली मध्ये शासनाकडून आवश्यक ते बदल करण्यात येत असून लवकरच याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

◼ सांगोला नगरपरिषद हद्दीमध्ये 15264 मालमत्ता धारक असून अद्यापही बऱ्याच मालमत्ताधारक यांनी नोंदी नगरपरिषदेकडे केल्या नसल्याने नगरपरिषदेकडून वार्षिक पुरवणी कर आकारणी ची मोहीम हाती घेण्यात आली आहे.सांगोला नगरपरिषद हद्दीतील ज्या मालमत्तांची अद्याप पर्यंत नगरपरिषदेकडे नोंद करण्यात आलेली नाही त्यांची नोंद करून नगरपरिषदेच्या उत्पन्नात वाढ होणे हा यामागील उद्देश आहे. जेणेकरून नगरपालिकेमार्फत करण्यात येणारी विकासकामे व नागरिकांना चांगल्या सोयी देता येतील. त्यास अनुसरून आजपर्यंत 312 नवीन मालमत्ताची मोजणी नगरपरिषदेच्या कर विभागाकडून करण्यात आली आहे.

◼स्ट्रीट लाईट सोय नसलेल्या शहरातील विविध भागात 350 पोल उभा करणेत आलेले असून स्ट्रीट लाईट व्यवस्था करण्यात येत आहे.

◼शहरातील ४००० स्ट्रीट लाईट्सचे देखभाल दुरुस्तीचे काम नगरपरिषदेकडून नियमित सुरू असून कोणतीही लाईट तक्रार दोन दिवसात निर्गत केली जात आहे.

◼सांगोला नगरपरिषद मार्फत पाण्याचे मीटर दुरुस्त करण्याची मोहीम हाती घेण्यात आलेली आहे.त्याअंतर्गत सांगोला शहरातील जवळपास 1106 नळ कनेकशन धारकांचे मीटर बंद, काढलेले असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा नळ कनेकशन धारकांना स्वखर्चाने मीटर दुरुस्ती साठी 30 जून पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. जे नळ धारक याबाबत कार्यवाही करणार नाहीत, त्यांना 1 जुलै 2024 पासून नगरपरिषद मार्फत दुप्पट दराने पाणीपट्टी कराची आकारणी केली जाणार आहे.

◼ सांगोला शहरात सध्या 31मार्च 2024 अखेर 6,364 नळ धारक कार्यरत आहेत. नगरपरिषद मार्फत पाणीपट्टी कराची दर सहामाहीला मीटर रिडींगनुसार पाणीपट्टी कराची वसुली केली जाते. 1 सप्टेंबर 2023 ते 31 मार्च 2024 या सहामाही ची मीटर रिडींग नुसार 5258 बिल वाटप पाणी पुरवठा विभागा मार्फत पूर्ण करण्यात आले.

◼ नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाकडून पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करणे , तुंबलेल्या गटारी स्वच्छता करणे, तसेच दैनंदिन स्वच्छतेची कामे करण्यात येत असून साथी च्या रोगाना आळा घालण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.

◼सांगोला नगरपरिषद मार्फत माझी वसुंधरा 5.0 ची प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. त्यापैकी भूमि या घटकांच्या अंतर्गत शहरात वृक्ष लागवडीचे काम सुरु आहे. 5 जुन जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नगरपरिषद मार्फत चिंचोली रोड पाण्याची टाकी परिसरात 100 जंगली वृक्षांची लागवड करण्यात आले.

◼माझी वसुंधरा 5.0 व स्वच्छ भारत अभियानातर्गत नगरपरिषद सांगोला यांच्या वतीने विविध कार्यक्रम घेण्यात आले व जनजागूती करन्यात आली असून सुभव करिअर अकॅडमी मध्ये युथ कोर्सेस तसेच पर्यावरण जनजागृती करण्यात आली.पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणारे कार्यक्रम घेऊन शहरातील नागरिकांना E pledge सर्टिफिकेट देण्यात आले.

◼एकल प्लास्टिक वापरास बंदी मोहिम सांगोला शहरात राबविण्यात येत असून प्लास्टिक बंदी व जनजागृती कार्यक्रम घेण्यात येत आहेत.

◼माझी वसुंधरा अंतर्गत पंचमहाभूतांचे महत्व पटवुन देण्यासाठी शहरा विविध ठिकाणी टाकाऊ पासुन टिकाऊ वस्तू पासून प्रतीकृती तयार करून माझी वसुंधरा योजनेचे महत्त्व पटवुन देत जनजागृती करण्यात येत आहे.

◼पावसाळ्यात इमारती पडून अपघात टाळण्यासाठी नगरपरिषदेकडून धोकादायक इमारतीचे सर्वेक्षण करण्यात आले असून यामध्ये 55 इमारती या धोकादायक इमारती या प्रकारात आढळून आल्या आहेत. संबधीताना नगरपरिषदेकडून याबाबत नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

◼ सांगोला शहराच्या मलनिःसारण ( भुयारी गटार योजना )टप्पा क्रमांक 1 चे काम प्रगतीपथावर सुरू आहे.सदर योजनेअंतर्गत शहरात विविध ठिकाणी HDPE DWC 200 MM व्यासाची पाईप लाईन 8386 मीटर, HDPE DWC 250 MM व्यासाची पाईप लाईन 115.5 मीटर टाकण्यात आली आहे. तसेच 224 Manhole पूर्ण झाले असून 233 Manhole चे काम सुरू आहे.

◼महाराष्ट्र नगरपरिषद , नगर पंचायती, औधोगिक नगरी अधिनियम १९६५ च्या कलम १०२ नुसार सांगोला नगरपरिषदेचे तिमाही व वार्षिक लेखे ठेवण्यात आले असुन कलम १०३ नुसार वार्षिक लेखे आणि सन २०२४-२०२५ मंजूर झालेला अर्थसंकल्प हे नगरपालिका क्षेत्रातील सर्व नागरिकासाठी निरीक्षणास उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!