सांगोला येथे महिलांसाठी महिला उद्योजकता

भारतीय स्त्री शक्ति संचालित, मैत्रीण कुटुंब सल्ला केंद्र व माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी महिला उद्योजकता प्रशिक्षण घेण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ. प्रेरणा करुळकर, माधवी ताई देशपांडे , सौ. वसुंधरा ताई कुलकर्णी, अनुराधा कुलकर्णी यांचे स्वागत करण्यात आले. माता बालक संस्थेच्या कार्यकर्त्या सौ. नीता लाटणे यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली तसेच माता बालक संस्थेच्या कामकाजाबाबत व विस्ताराबाबत सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या व ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या कार्यकर्त्या सौ. प्रेरणा करुळकर मॅडम यांनी आपल्या मनोगतातून बोलताना पुर्वी महिला चूल आणि मूल एवढेच पाहत होत्या पण आता महिला सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहेत. अगदी ST बस चालकापासून विमान सुद्धा महिला चालवतात तसेच देशाचे राष्ट्रपती सुद्धा महिलाच आहे उद्योग धंद्यातही महिला आता उंच भरारी घेत आहेत. मुलींचे शिक्षणाचे प्रमाण देखील आता वाढले आहे त्यामुळे खेड्यातील मुली देखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्वच क्षेत्रात काम करत आहेत. आता महिला उद्योगात उतरल्यामुळे मुलांना सर्व आर्थिक व्यवहार समजत चालले आहेत व त्यांचा आर्थिक स्तर वाढलेला आहे. विशेषतः ग्रामीण भागातील महिला आता छोटा मोठा व्यवसाय सुरु करून स्वतः आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनल्या आहेत. तसेच महिलांसाठी त्यांनी स्वयंम मुल्यामापानाचा फॉर्म भरून घेतला फॉर्म भरण्याकरिता महिलांचा खूप छान प्रतिसाद होता.
भारतीय स्त्री शक्ती संचालित मैत्रीण कुटुंब सल्ला केंद्राच्या कार्यवाह सौ वसुंधरा कुलकर्णी यांनी जमलेल्या महिलांना मैत्रीण कुटुंब सल्ला केंद्राची माहिती दिली तसेच केंद्रातर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांबाबत माहिती दिली. तसेच बचत गटातील महिला आता उद्योजकतेकडे वळू लागल्या आहेत त्यामुळे १० महिला मिळून छोटासा क होईना उद्योग सुरु करू लागल्या आहेत त्यामुळे ग्रामीण भागातही आर्थिक अवस्था सुधारू लागली आहे. खेडोपाड्यातील महिलांनी बचत गटामार्फत लघुउद्योग सुरु केले पाहिजे त्यासाठी बचत गटातील महिलांना बँकेकडूनही कर्ज दिले जाते असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाच्या वेळी प्रमुख पाहुण्या ज्ञानप्रबोधिनी पुणे संस्थेच्या कार्यकर्ता सौ. प्रेरणा कारुळकर, माता बालक संस्थेच्या उपाध्यक्षा माधवी ताई देशपांडे मैत्रीण कुटुंब सल्ला केंद्राच्या कार्यवाह सौ. वसुंधरा कुलकर्णी, समुपदेशक गणेश बाबर, माता बालक संस्थेच्या कार्यकर्त्या सौ. नीता लाटणे, सौ. संपदा दौंडे, सौ, मंगल कुलकर्णी तसेच सांगोल्यातील ५० हून अधिक महिला उपस्थित होत्या.