उत्कर्ष उच्च माध्यमिक विद्यालयात इ .11 वी च्या विद्यार्थ्यांचे स्वागत.

सान्गोला- इयत्ता दहावी प्रमाणे बारावी बोर्ड परीक्षा,सी.ई .टी,जे.ई ई ,नीट या परीक्षेमध्ये सुयश प्राप्त करावयाचे असेल तर विद्यार्थ्यांनी धीरोदत्तपणे व पुर्ण आत्मविश्वासाने परीक्षेस सामोरे जावे,असे विचार प्रा.राजाभाऊ ठोंबरे यानी व्यक्त केले.उत्कर्ष उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता अकरावी शास्त्र व वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
या प्रसंगी व्यासपिठावर प्राचार्य सुनील कुलकर्णी,उत्कर्ष बालक मंदिराच्या मुख्याध्यापिका संध्या शास्त्री,विभागप्रमुख सुनयना मजगे,जे.के.अकादमीचे पुराणिक सर आदि उपस्थित होते. या प्रसंगी प्रा.ठोंबरे यानी नुकत्याच झालेल्या टी- ट्वेंटी विश्वकप विजेत्त्या भारतीय संघाचे उदाहरण देवून यश कसे प्राप्त करावे हे भारतीय संघाने दाखवून दिले आहे हे सांगून विद्यार्थ्यांनी ती सकारात्मकता जोपासून यश प्राप्त करावे असे आवाहन केले.
प्रारंभी मान्यवरांचे हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले.सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी स्वयंपरिचय करुन दिला.शिक्षकांपैकी प्रा.प्रसाद लोखंडे आणि प्रा.तेजस्विनी मेटकरी यानी मार्गदर्शन केले.उत्कर्ष विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा विद्यार्थ्यांनी जोपासवि व संख्यात्मक निकाला प्रमाणे विद्यार्थ्यांनी गुणात्मक निकाल वाढवावा,अशी अपेक्षा प्राचार्य सुनील कुलकर्णी यांनी व्यक्त केली.या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करुन स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.सुनयना मजगे,आभार प्रदर्शन केदार मॅडम व सुत्रसंचालन वसमळे मॅडम यानी केले