मेडशिंगी येथील माजी मुख्याध्यापक बापूसाहेब इंगवले- पाटील यांचे निधन

मेडशिंगी (वार्ताहर) मेडशिंगी येथील माजी मुख्याध्यापक बापूसाहेब तात्यासो इंगवले पाटील यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.मृत्यू समयी त्यांचे वय 73 वर्षे होते.

प्राथमिक शिक्षक म्हणून त्यांनी जुनोनी येथे 1978 ते 1982 व 1982 ते 2004 मेडशिंगी, 2004 ते 2008 हंगिरगे व मुख्याध्यापक पदी जि.प प्रा.शाळा शेरी नंबर एक वेळापूर येथे सेवा बजावली. 2011 साली ते सेवानिवृत्त झाले. 33 वर्षाच्या प्रदीर्घ सेवा काळात विद्यार्थीप्रिय व कडक शिस्तीचे शिक्षक म्हणून त्यांनी काम केले. तसेच मेडशिंगी येथे 1997 साली स्थापन झालेल्या कै. संभाजीराव तथा दादासाहेब शेंडे सहकारी पतसंस्थेचे संस्थापक संचालक म्हणून स्थापनेपासून 27 वर्ष कार्य केले.

दुय्यम निबंधक कार्यालय सांगोला येथील संगणक ऑपरेटर सतीश गायकवाड़ यांचे ते मामा होते.त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे, मुलगी असा परिवार आहे. त्यांचा तिसरा दिवसाचा विधि बुधवार दिनांक 3 जुलै रोजी सकाळी 7:30वा.मेडशिंगी येथे होणार असल्याचे नातेवाईकाकडुन सांगण्यात आले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button