उत्कर्ष विद्यालयाची शिष्यवृत्तीतील यशस्वी वाटचाल

सांगोला (प्रतिनिधी):- माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान संचलित उत्कर्ष विद्यालयाने शिष्यवृत्ती स्पर्धेमध्ये इ.पाचवी 12 व इ.आठवी 9 अशा एकूण 21 विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत मानाचे स्थान मिळवत शिष्यवृत्तीधारक बनलेले आहेत .
सन 2021-22 या या शैक्षणिक वर्षांमध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व आठवी या शिष्यवृत्ती स्पर्धेमध्ये इयत्ता पाचवी च्या 3 2 विद्यार्थ्यांपैकी 30 विद्यार्थी पात्र झालेले आहेत व बारा विद्यार्थी गुणवत्ता यादीत आलेले आहेत .
कु.प्रीती परमेश्वर दिघे -264, चि.सर्वेश सुहास कुलकर्णी-264, चि.तन्मय सतीश सपताळ-258, स्वरांजली विकास-259, विराज आलदीप टापरे – 246, ओवेश जमीर मुजावर-242, राजवर्धन औदुंबर लिगाडे-238, अथर्व निलेश रसाळ – 236, श्रावणी दत्तात्रय बनसोडे – 228, देवदत्त रणजीत केळकर-228, सायली सुदर्शन इंगवले-224, समृद्धी सचिन भंडारे-220
या विद्यार्थ्यांना श्रीम.अनुराधा लिंगे (विभाग प्रमुख), सौ .सुवर्णा सपकाळ श्रीम.निशा बनसोडे व सौ .गौरी मिसाळ यांचे मार्गदर्शन लाभले.
इयत्ता आठवीतील गुणवंत विद्यार्थी पुढील प्रमाणे- चि.ऋषी भारत पैलवान-252, कु.दिबा समीर मणेरी-250, कु.श्रुती कुमार पाटकुलकर-242, चि.वेदांत अविनाश गडदे-242, चि.यशराज श्रीकांत इंगोले पाटील – 236, कु.नेहा नवनाथ लेंडवे – 236, चि.श्री अमर कांबळे – 234, चि.विश्वजीत औदुंबर लिगाडे – 206, कु.ऋतुजा सिध्देश्वर मेटकरी – 206
या परीक्षेत 29 पैकी 26 विद्यार्थी पात्र झाले आहेत तर 9 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झालेले आहेत. या मुलांना श्री संचित राऊत (विभाग प्रमुख), सौ.निर्मला भोसले, श्री.रवी कुंभार, सौ.गौरी गुळमिरे, शुभांगी कवठेकर, सौ फरिदा शेख, सौ.रेखा दौडे, श्री.दत्तात्रय सावंत सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले होते.
स्पर्धेत यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थांचे कौतुक संस्थाध्यक्षा डॉ.संजुताई केळकर, पूर्व प्राथ.विभागाच्या मुख्याध्यापिका सुनीता कुलकर्णी, प्राथ.विभागाच्या मुख्याध्यापिका विश्रांती बनसोडे, उपमुख्याध्यापक स्वराली कुलकर्णी, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री.सुनील कुलकर्णी सर, पर्यवेक्षक मिसाळ सर, यांच्यासह सर्व शिक्षकांनी भरभरून कौतुक केले.