रोटरी क्लब सांगोला यांच्यावतीने श्री छत्रपती शिवाजी विद्यामंदिर धायटी येथे वृक्षारोपण व इंटरॲक्ट क्लब स्थापना प्रक्रिया.

रोटरी क्लब सांगोला यांच्यावतीने श्री छत्रपती शिवाजी विद्या मंदिर धायटी येथे विविध प्रजातीच्या झाडाचें वृक्षारोपण करण्यात आल. क्लबचे पर्यावरण डायरेक्टर रो.माणिक भोसले सो यांच्या पुढाकाराने सदर कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पडला. या कार्यक्रमांमध्ये शालेय मुले व मुली यांनी अंदाजे १०० रोपाची लागवड केली.

या प्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष रो.विकास देशपांडे यांनी रोटरी या जागतिक संस्थेची माहिती दिली. तसेच इंटरॅक्ट क्लब कशा पद्धतीने स्थापन करावा व त्याचे कार्य कशा पद्धतीने चालावे याची सखोल माहिती दिली. रो.माणिक भोसले सो यांनी पर्यावरण संबंधी विविध माहिती व नियम समजून सांगितले.व शाळेमध्ये नवीन इंटरॲक्ट क्लब स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली

यावेळी संस्थेचे अध्यक्ष व रोटरी क्लबचे सदस्य रो.डॉ. शिवराज भोसले, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री जगताप सर, व सर्व शिक्षक वृंद हजर होता. याप्रसंगी शाळेची शाळेचे विद्यार्थीनी कु.सायली माने हीचा क्रीडा क्षेत्रात प्रथम आल्या बद्दल सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.लिगाडे सर यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button