शोभेच्या दारु विक्री तात्पुरते परवान्यासाठी १४ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

जिल्हयात (पोलीस आयुक्तालय हद्द वगळून) सन २०२४ दिपावली सणाकरीता शोभेच्या दारु विक्रीचे (फटाके विक्रीचे) तात्पुरते परवाने वितरीत करण्यात येणार आहेत.  तात्पुरत्या परवान्यासाठी विहित नमून्यातील (एलई- ५) अर्ज जिल्हादंडाधिकारी कार्यालय, सात रस्ता, शासकीय दुध डेअरी शेजारी,सोलापूर येथे उपलब्ध असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पत्रकान्वये कळविले आहे.

अर्जातील माहिती पूर्णपणे भरुन त्यासोबत  अर्जदाराचे दोन फोटो, ग्रामपंचायत / नगरपालिका / नगरपरिषद यांचेकडील विहीत मृद्दयांबाबतचे ना-हरकत प्रमाणपत्र, १८ वर्ष पूर्ण झालेबाबतचा वयाचा पुरावा (एल. सी./जन्मदाखला)  संबंधित जागेचे ७/१२ किंवा मिळकत उतारा व नकाशा जागेबाबत स्थानिक प्राधिकरणाचे संमतीपत्र   स्वं॑यघोषणापत्र आदी आवश्यक असलेली कागदपत्रे जोडावीत.

अर्जांच्या चौकशीअंती रु.६००/- चलनाने भरलेले परवाना फी तसेच यापूर्वी काढण्यात आलेल्या परवान्याची प्रत इत्यादीसह परीपूर्ण अर्ज दिनांक २९ सप्टेंबर  ते १४ ऑक्टोबर २०२४ (सुट्टीचे दिवस वगळून) रोजीपर्यंत सादर करावेत,  परवाने देणेपूर्वी पोलीस विभागाकडून चौकशी अहवाल प्राप्त होणे आवश्यक असल्याने दिलेल्या मुदतीनंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी. तसेच सदर कामकाजाच्या कोणत्याही टप्प्यावर मा. शासनाकडील व मा.न्यायालयाकडील प्राप्त निर्देश,अटी व शर्ती हे तात्पुरते परवानाधारक/अर्जदार यांचेवर बंधनकारक राहतील. मा.शासनाच्या व मा.न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे परवाने देणेबाबत परवाना प्राधिकारी हे अंतिम निर्णय घेतील.

परवान्याबाबत अधिक माहितीसाठी गृह शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, सात रस्ता, शासकीय दुध डेअरी शेजारी सोलापूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हादंडाधिकारी कुमार आशीर्वाद  यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button