सांगोला महाविद्यालाच्या विद्यार्थ्यांची किल्ले प्रतापगड येथे स्वच्छता मोहीम संपन्न

सांगोला (येथील) महाराष्ट ही संतांची भूमी आहे. राजा शिवछत्रपतींनी याच मातीत स्वातंत्र्याचे तोरण बांधून आपले स्वराज्य निर्माण केले. महाराजांचे गड किल्ले हे आपले वैभव आहेत. त्यांचे रक्षण, संवर्धन व स्वच्छता राखणे हे आपले आदी कर्तव्य आहे. याच भूमिकेतून सांगोला महाविद्यालाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागा कडून स्वच्छता हीच सेवा या उपक्रमा अंतर्गत गड किल्ले स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
रविवार दि २२ सप्टेंबर २०२४ रोजी सांगोला महाविद्यालाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवकांनी किल्ले प्रतापगड येथे स्वच्छता मोहीम राबिवली. सध्या पावसाळा असल्यामुळे प्रतापगडावर खूप प्रमाणात गवत व झाडी वाढली होती ती तोडण्यात आली. तसेच ज्या ठिकाणी शेवाळ आलेले होते ते काढण्यात आले. पर्यटकांकडून टाकण्यात आलेल्या प्लास्टिक च्या वस्तू, प्लास्टिक पिशव्या, पाणी बाटली गोळा करून विद्यार्थ्यांनी हा सर्व कचरा कचरा कुंडीत टाकून हा परिसर स्वच्छ केला. हा उपक्रम राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ नवनाथ शिंदे व डॉ सदाशिव देवकर यांनी आयोजित केला होता. डॉ सदाशिव देवकर, डॉ विद्या जाधव, महेश घाडगे, प्रा. तृप्ती लामगुंडे यांनी या उपक्रमा मध्ये सहभाग घेतला. या स्वच्छता मोहीमेसाठी महाविद्यालायचे प्राचार्य डॉ सुरेश भोसले यांचे मार्गदर्शन लाभले.