रोटरी क्लबच्या वतीने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना ई लर्निंग स्टडी ॲपचे वितरण…

रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रल व रोटरी क्लब ऑफ सांगोला यांच्यावतीने अशोकराव देसाई कृषी विद्यालय, आलेगाव. या ठिकाणी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना ई लर्निंग ॲप देण्यात आले. या ई लर्निंग ॲपमुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने स्वतः अभ्यास करताना मदत होणार आहे. सर्व विषयांचे सर्व घटक पुन्हा एकदा उजळणी करताना त्यांना या ऑनलाइन पद्धतीची मदत होणार आहे. हे वापरण्यास सुलभ व मराठी माध्यम सेमी माध्यम अशा सर्व मुलांना उपयुक्त असे हे ॲप आहे.

ते एका कार्डवर एकदाच लॉगिन करून घेता येते त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला एक याप्रमाणे 39 विद्यार्थ्यांना हे ॲप देण्यात आले.या ॲपचे बाजार मूल्य 1111 रुपये इतके आहे. परंतु रोटरी क्लबच्या वतीने ते विद्यार्थ्यांना मोफत देण्यात आले. याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा व चांगली शैक्षणिक प्रगती करावी अशा पद्धतीच्या भावना दोन्ही रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ साजिकराव पाटील व सौ. पियाली आलेगावकर मॅडम यांनी व्यक्त केल्या व गावकरी तसेच शिक्षक व सर्व प्रतिष्ठित मंडळी यांनी रोटरीच्या या कामाबद्दल धन्यवाद व्यक्त केले.

कार्यक्रमासाठी अतिथी म्हणून डॉ. पियुष साळुंखे पाटील हे उपस्थित होते. डॉक्टरांनी आपले अनुभव कथन करताना विद्यार्थी गणितावर दुर्लक्ष करतात नववी दहावीचे गणित कच्चे राहते त्यामुळे पुढे भौतिकशास्त्र विषय शिकताना अडचणी येतात. असे सांगून मुलांना सर्व विषयांचाआपण योग्य अभ्यास करावा. असे मार्गदर्शन केले. संस्थेचे पदाधिकारी माननीय गुलाबराव बाबर यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाचे महत्त्व व या नवीन तंत्रज्ञानाचा वापर याबद्दल जागृत केले व चांगल्या अभ्यास करावा असे सुचविले. पोलीस पाटील, उपसरपंच व इतर मान्यवर उपस्थित होते. पत्रकार संजय बाबर व त्यांचे सहकारी सुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button