सह्याद्री फार्मसी कॉलेजमध्ये बी.फार्मसी,एम.फार्मसी अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा निरोपसमारंभ उत्साहात संपन्न :

सह्याद्री कॉलेज ऑफ फार्मसी मेथवडे या महाविद्यालयात बी.फार्मसीच्या अंतिम
वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी निरोपसमारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे उदघाटन प्रमुख पाहुणे
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.दिलीपकुमार इंगवले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मनोजकुमार पाटील यांच्या हस्ते
सरस्वतीमातेच्या फोटोचे पूजन व दीपप्रज्वलन करून झाले.यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुलाब पुष्प, भेटवस्तू
देऊन बी.फार्मसी, एम.फार्मसी अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

प्रा.एस.एस.काळे व डॉ.एन.ए.तांबोळी यांनी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मनोगतात " फार्मसी क्षेत्र भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात नावलौकिक मिळवलेले क्षेत्र आहे.भारत देश औषनिर्मितीत दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे त्यामुळे या क्षेत्रात रोजगाराच्या
भरपूर संधी आहेत.विद्यार्थ्यांनी नीतिमूल्ये जपली पाहिजेत व अपार कष्ट करून यशाची शिखरे पादाक्रांत केली
पाहिजेत असे सांगून फार्मसी क्षेत्राचे महत्व व भविष्यात असणाऱ्या रोजगाराच्या संधी याबद्दल माहिती
सांगितली.

तसेच विद्यार्थी कु.पूनम बंडगर, चि.सुशांत येडगे,चि.प्रदीप महानवर यांनी आपल्या मनोगतात सह्याद्री
फार्मसी कॉलेज हे जुने अनुभवी कॉलेज असून या महाविद्यालयात उपलभद्ध आसणारे, अनुभवी व तंज्ञ
प्राध्यापकवर्ग, अद्यावत उपकरणे, सुसज्य ग्रंथालय, अत्याधुनिक प्रयोगशाळां व कलासरूम, सोयीयुक्त वसतिगृह व
कॅन्टीन, अभ्यासमय, शैक्षणिक तसेच निसर्गरमय वातावरण, डिजिटल शिक्षण पद्धती, निशुल्क वाहतुकीची सुविधा, व
इतर सेवा सुविधा यामुळे फार्मसी क्षेत्रात हे एक नावाजलेले कॉलेज असून येथील शिस्त व गुणात्मक शिक्षण
पद्धतीमुळे आमच्या उज्वल यशस्वी भविष्यात सह्याद्रीचे मोलाचे योगदान असणार आहे असे मत विद्यार्थ्यांनी

व्यक्त केले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विद्यार्थिनी कु.वैष्णवी उन्हाळे व कु.पूजा दबडे यांनी केले तर आभारप्रदर्शन
प्रा.एस.एस.काळे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button