पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत नाझरा विद्यामंदिर प्रशालेचे घवघवीत यश..

 

नाझरा(वार्ताहर):-  महाराष्ट्र शिक्षण परिषद पुणे यांच्यावतीने फेब्रुवारी मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत नाझरा विद्यामंदिर ने घवघवीत यश संपादन करत यशाची परंपरा कायम राखली आहे. बाहेर कोणत्याही प्रकारचे तास न लावता केवळ शाळेतील मार्गदर्शनावरच विद्यार्थ्यांनी हे घवघवीत यश संपादन केले आहे.

इयत्ता आठवीचा पवनराजे दिगंबर शिंगाडे हा विद्यार्थी राज्य ग्रामीण मधून 262 गुण मिळवून राज्यात १७वा व राष्ट्रीय ग्रामीण जिल्ह्यात २ रा तर राष्ट्रीय ग्रामीण मधून ओमराज सतीश कारंडे 242 गुण मिळवून ८ वा आला आहे.जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवलेले पाचवी चे विद्यार्थी-कुमारी ऐश्वर्या ज्ञानेश्वर पांढरे 224 गुण मिळवून जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत 263 वी. तर  कुमार जिशान सर्फराज काझी 220 गुण मिळवून जिल्ह्याच्या गुणवत्ता यादी 311 वा, आला आहे.इयत्ता आठवीचे जिल्हा गुणवत्ता यादीतील विद्यार्थी खालील प्रमाणे-
हिम्मतराव नवनाथ शिंगाडे 230 गुण जिल्हा गुणवत्ता यादी तेरावा,योगेश संतोष पाटील 228 गुण जिल्हा गुणवत्ता यादीत 16 वा.,अनंत मारुती मिसाळ 226 गुण जिल्हा गुणवत्ता यादीत 20 वा,मन्मत वीराप्पा चौगुले 218 गुण जिल्हा गुणवत्ता यादीत 31 वा.,मल्लेश बिराप्पा चौगुले 214 गुण जिल्हा गुणवत्ता यादीत 40 वा,कार्तिकीय जालिंदर मिसाळ 212 गुण जिल्हा गुणवत्ता यादीत 47 वा,कौस्तुभ विजय चव्हाण 206 गुण जिल्हा गुणवत्ता यादीत ७८वा,दुर्गेश्वरी आशिष सोनवणे 204 गुण जिल्हा गुणवत्ता यादीत 88 वी,अतुल बापू जाधव 200 जिल्हा गुणवत्ता यादीत 111 वा.मन्मत संतोष शेळके 198 गुण जिल्हा गुणवत्ता यादीत 114 वा,विघ्नेश भारत राऊत 198 गुण जिल्हा गुणवत्ता यादीत 122,लक्ष्मी राजू मेखले 192 गुण जिल्हा गुणवत्ता यादीत 166 वा,समृद्धी सतीश बंडगर 178 गुण मिळवून जिल्ह्या गुणवत्ता यादी आली आहे सदर विद्यार्थ्यांना पाचवी विभाग प्रमुख सुनील जवंजाळ, वसंत गोडसे महालिंग पाटील मारुती सरगर तर आठवीसाठी विभाग प्रमुख दिलीप सरगर,वसंत गोडसे,सूर्यकांत कांबळे,दीप्ती काशीद, मंजुश्री ओतारी यांचे मार्गदर्शन लाभले.

सर्व विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे  अभिनंदन सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके,संस्था सचिव मल्लिकार्जुन घोंगडे,संस्था सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके,कार्यकारणी सदस्य विश्वेश झपके,प्राचार्य बिभीषण माने, पर्यवेक्षक मधुकर धायगुडे,संस्था बाह्य परीक्षा विभाग प्रमुख नामदेव खंडागळे,वैभव कोठावळे,प्रशाला बाह्य परीक्षा विभाग प्रमुख वसंत गोडसे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.

नाझरा विद्यामंदिर मधील शिक्षकांनी घेतलेल्या अथक परिश्रमामुळे सदरचे यश विद्यार्थ्यांना मिळाले आहे. विद्यार्थ्यांचा सातत्याने सराव व कमी गतीच्या विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष ही संकल्पना राबवून विद्यार्थ्यांच्या गुणात्मक वाढीसाठी प्रयत्न होत असतात.सांगोला तालुक्यात ग्रामीण भागात असणारी ही शाळा दिवसेंदिवस गुणवत्तेच्या बाबतीत अग्रेसर होत असल्याने आम्हा पालकांमधून याबाबत समाधान व्यक्त केले जात आहे. गुणात्मक वाढीबरोबरच संस्कारक्षम विद्यार्थी घडवण्यासाठी ही प्रशाला नेहमीच अग्रेसर असते. संस्कारक्षम विद्यार्थी घडवण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न या शाळेत केले जातात.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असलेल्या शाळेचा गुणवत्तेचा आलेख असाच वाढत जावो हीच सदिच्छा.
पालक दिगंबर शिंगाडे (माजी पंचायत समिती सदस्य सांगोला)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button