महाराष्ट्र

सांगोल्याच्या राजकीय इतिहासातील सर्वात मोठा पक्षप्रवेश ; बालेकिल्ल्यातच शेकापला जबर हादरा

गेली ३० ते ३५ वर्ष सेवा आणि वारकरी संप्रदायाचा वारसा घेऊन मी सांगोला तालुक्याच्या राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक जीवनात सक्रियपणे काम करत आहे गेली ३० ते ३५ वर्ष निस्वार्थ आणि निरपेक्ष भावनेने सांगोला तालुक्यातील जनतेची मी सेवा करत आहे. सांगोला विधानसभा मतदारसंघातील जनतेचा माझ्यावर असलेला विश्वास हेच आपले राजकीय भांडवल असून शेवटच्या श्वासापर्यंत सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षा आणि विश्वासाला आपण तडा जाऊ देणार नाही असा विश्वास महाविकास आघाडीचे उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी व्यक्त केला.

घेरडी ता सांगोला येथील शेतकरी कामगार पक्षाचे दिग्गज नेते भाऊसाहेब यमगर सर यांच्या पक्षप्रवेशाच्या सोहळ्यात दिपकआबा बोलत होते. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते व भाऊसाहेब यमगर सरांचे असंख्य समर्थक उपस्थित होते.
गेल्या ३० वर्षापासून घेरडी गटात शेतकरी कामगार पक्षाचे एकहाती वर्चस्व प्रस्थापित करण्याचे काम करणारे शेकापचे दिग्गज नेते भाऊसाहेब यमगर सर यांनी शेकापमधील अंतर्गत गटबाजीला कंटाळून दिपकआबा साळुंखे यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मशालीची सर्वाधिक धग शेकापला बसली असून हजारो कार्यकर्त्यांनी दिपकआबांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्याने शेकापचा गड नेस्तनाबूत झाला आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या दिग्गज नेत्याने आपल्या असंख्य समर्थक कार्यकर्त्यांसह दिपकआबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केल्याने सांगोला तालुक्याच्या राजकीय इतिहासातील हा सर्वात मोठा पक्षप्रवेश मानला जात आहे.

निष्ठावंत आणि प्रामाणिकपणे शेतकरी पक्षात काम करत असताना सध्याचे नेतृत्व मनमानी कारभार करून अवहेलना करत असल्याने अनेक शेकापाचे निष्ठावंत कार्यकर्ते पक्षाला अखेरचा रामराम करीत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करीत आहेत. शेकापचे नेते भाऊसाहेब यमगर यांनी घेरडी गटात शेकापचे वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी ३० वर्षे प्रामाणिकपणे काम केले. परंतु स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर पक्षात हुकूमशाही सारखी परिस्थिती निर्माण झाली असल्याने अनेक कार्यकर्ते नाराज झाले आहेत. शेकापचे सध्याचे नेते मनमानी कारभार करून अडचणीत आणण्याचे काम करीत आहेत. शेकापमधील अंतर्गत गटबाजीला कंटाळून अखेर भाऊसाहेब यमगर यांनी दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करून मशाल हाती घेतली आहे.
शेकापमध्ये प्रामाणिक काम करूनही सध्याच्या नेतृत्वाने अपमानास्पद वागणूक दिल्याने याचा बदला विधानसभेच्या निवडणुकीत घेतला जाईल असा विश्वास व्यक्त करून शिवसेनेच्या मशालीची धग शेकापला निश्चित जाणवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा विश्वास शिवसेनेत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. विधानसभा निवडणुकीत घेरडी गटात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांना विक्रमी मताधिक्य देऊन विजय करण्याचा संकल्प शिवसेनेत प्रवेश केलेला कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
शेकापचे नेते भाऊसो काकासो यमगर, माजी सरपंच अंकुश केराप्पा लोखंडे, माजी सरपंच राजाप्पा पांडुरंग घुटूकडे, दूध संस्थेचे चेअरमन सुरेश मारुती कोळेकर, चेअरमन भोजलिंग तुकाराम घुटुकडे, माजी उपसरपंच मसू पांडुरंग घुटुकडे, अनिल रावसो यमगर, वामन राऊबा यमगर, वसंत राऊबा यमगर, तातोबा सुखदेव यमगर, शिवाजी केशव यमगर, तानाजी तुकाराम यमगर, संजय हरिबा यमगर, अजित विठ्ठल यमगर, सतीश रामचंद्र यम गर, तातोबा नामदेव यमगर, दादू हरिबा यमगर, वसंत हरिबा यमगर, जगन्नाथ भगवान यमगर, अशोक राजाराम यमगर, सिद्धेश्वर धोंडीबा यमगर, बंडा यमगर सचिन देवजी यमगर, सावळा देवबा यमगर, भानुदास मनगीना यमगर, संजय कोंडीबा यमगर, रामचंद्र नामदेव यमगर, तुकाराम बजरंग यमगर, बाबासो श्रीमंत यमगर, विकास पांडुरंग यमगर, बाबासो गुजरा यमगर, आबा राघू यमगर, प्रकाश अण्णा यमगर, सुरेश आण्णा यमगर, अमित बिरा यमगर, समाधान बयाजी यमगर, बिरा दत्ता घुटुकडे, रमेश पोपट यमगर, दगडू केराप्पा लोखंडे, सदा घुटूकडे, आबा तानाजी कोळेकर, राघू गावडे, भीमराव खांडेकर, पांडुरंग पुकळे, अमोल रावसो सावंत, समाधान पुकळे, दत्ता राजाराम पुकळे, जयवंत रामचंद्र पोळ, संतोष तुकाराम घुटुकडे, अनिल पोपट घुटुकडे, धोंडीबा दादासो मे, सुरेश बुरुंगले, प्रकाश दत्ता दिवसे, शहाजी संतोष करे, पोपट तुकाराम यमगर, अशोक हरिबा यमगर, तानाजी राजाराम यमगर, संजय हरिबा यमगर, संतोष श्रीमती यमगर, नाना पुनाजी यमगर, समाधान बयाजी यमगर, दाजी काकासो यमगर, अमोल सिद्धेश्वर यमगर, तानाजी तुकाराम यमगर, गणेश अण्णाप्पा यमगर, आबा बिरा यमगर, अमोल चिलाप्पा यमगर, सिद्धेश्वर दादा यमगर, अविनाश संजय यमगर, महादेव दरिबा यमगर, पंडा नारायण यमगर, सुभाष नारायण यमगर, भारत वामन यमगर, तानाजी राजाराम यमगर, सुखदेव अण्णा यमगर, अण्णा बाजी यमगर, अशोक हरिबा यमगर, बाळू सुबराव यमगर, संतोष तुकाराम यमगर, सागर विकास यमगर, आकाश यमगर, कृष्णा सिद्धेश्वर यमगर, धोंडीबा रेवे, विजय तातोबा यमगर, सचिन लक्ष्मण घुटुकडे, समाधान बाळू कोकरे, अमोल लक्ष्मण घुटुकडे, सर्जेराव अण्णाप्पा यमगर, अनिल घुटूकडे, सुनील लोखंडे, आबा गावडे, बिरुदेव सयाप्पा बिचुकले, किरण उत्तम बिचुकले, सचिन लोखंडे, नवनाथ मेटकरी या प्रमुख कार्यकर्त्यांसह असंख्य कार्यकर्त्यांनी दिपकआबांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

 

डॉक्टरबंधूंनी मदतीची जाणीव ठेवून महाविकास आघाडीचा धर्म पाळावा

महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी गेली वीस ते पंचवीस वर्षे स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला महाविकास आघाडीने दिपकआबांच्या कामाचा अनुभव आणि तालुक्यातील राजकीय ताकद यांचा विचार करून त्यांना उमेदवारी दिली आहे. डॉ. बाबासाहेब देशमुख आणि डॉ. अनिकेत देशमुख या दोन्ही डॉक्टरबंधूंनी दिपकआबा साळुंखे पाटील यांनी स्वर्गीय आबासाहेबांना केलेल्या मदतीची जाणीव ठेवून महाविकास आघाडीचा धर्म पळावा आणि अजूनही दिपकआबांना आपला पाठिंबा जाहीर करावा अशी भावना शेतकरी कामगार पक्षातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button