sangola

भूकरमापक तथा लिपीक-टंकलेखक संवर्गाची सुधारित प्रतिक्षायादी प्रसिद्ध

HTML img Tag Simply Easy Learning    

उपसंचालक भूमि अभिलेख पुणे प्रदेश पुणे यांच्या अधिनस्त विभागातील गट क पदसमूह 4 (भूकरमापक तथा लिपीक टंकलेखक) संवर्गातील रिक्त पदे भरण्याकामी दि 28 एप्रिल 2023 रोजी निवडसूची व प्रतिक्षा यादी प्रसिध्द करण्यात आली होती. जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख यांच्या सूचने नुसार विभागातील रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने प्रादेशिक निवड समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांची प्रवर्गनिहाय सुधारित प्रतिक्षायादी प्रसिध्द केली आहे,

जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य) पुणे यांच्याकडील दि. 26 एप्रिल 2024 व 19 जून 2024 रोजीच्या पत्रान्वये दिलेल्या सुचनेनुसार ऑनलाईन परिक्षा निकालाच्या (सर्वसाधारण गुणवत्ता यादी) आधारे प्रादेशिक निवड समितीने दि. 17 ते 21 एप्रिल 2023 या कालावधीत कागदपत्रे पडताळणीमध्ये पात्र ठरविलेल्या उमेदवारांकडून विभागातील उपलब्ध सामाजिक व समांतर आरक्षण विचारात घेवून यापूर्वी प्रसिध्द करण्यात आलेल्या प्रतिक्षायादीतील नेमणूक दिलेले व निवड रद्द करण्याबाबत विनंती केलेले उमेदवार वगळून विभागातील रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने प्रादेशिक निवड समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांची प्रवर्गनिहाय सुधारित प्रतिक्षायादी उपसंचालक भूमि अभिलेख, पुणे प्रदेश पुणे व जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर या कार्यालयाच्या बोर्डावर प्रसिध्द करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख, दादासाहेब घोडके यांनी दिली.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!