महाराष्ट्र

उद्यम आधार कार्यशाळा आणि व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रमाचा यशस्वी समारोप

 

माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान यांच्या वतीने उद्यम आधार असलेल्या महिलांसाठी नुकतेच सांगोला येथील उत्कर्ष कौशल्य विकसन केंद्रात एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत तज्ज्ञ मार्गदर्शकांनी शासकीय योजनांबाबत माहिती दिली, नवीन व्यवसाय सुरू करण्याचे मार्गदर्शन केले, तसेच मार्केटिंग तंत्र शिकवले. सहभागी महिलांना महाराष्ट्र शासनाचे प्रमाणपत्र देण्यात आले.

तसेच, माता बालक उत्कर्ष प्रतिष्ठान, महाराष्ट्र शासन आणि DICCI यांच्या संयुक्त विद्यमाने RAMP Training Program यशस्वीरीत्या पार पडला. यावेळी श्री. प्रसाद तावसे, श्री. प्रदीप बागुल, श्री. गजेंद्र कुलकर्णी आणि सौ. अंजली कुलकर्णी यांचे स्वागत संस्थेच्या सचिव सौ. वसुंधरा कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात ‘इतनी शक्ति हमें देना दाता’ या प्रार्थनेने झाली.

प्रशिक्षणादरम्यान, तज्ज्ञांनी व्यवसायासाठी आवश्यक चार महत्त्वाची कौशल्ये – व्यवसाय कौशल्य, शासकीय योजना, आर्थिक नियोजन आणि मार्केटिंग यावर सखोल मार्गदर्शन केले. प्रदीप बागुल सरांनी विविध शासकीय कर्ज योजनांची माहिती दिली, जसे की प्रधानमंत्री मुद्रा योजना, Stand Up India योजना, PMEGP, PMFME आणि MSME साठीच्या कर्ज योजना.

मार्केटिंगच्या महत्त्वावर भर देताना प्रशिक्षकांनी सध्याच्या डिजिटल युगातील स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, अकाउंटिंग सॉफ्टवेअर, बजेटिंग अॅप्स आणि ऑनलाईन बँकिंगचा व्यवसायात कसा उपयोग करावा हे स्पष्ट केले. तसेच, क्लस्टर डेव्हलपमेंट स्कीमद्वारे महिला उद्योजकांना एकत्र येऊन मोठ्या प्रमाणावर व्यवसाय संधी निर्माण करण्यासाठी प्रेरणा देण्यात आली.

कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी महिलांना प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली आणि सौ. धनश्री सोनंदकर यांनी मान्यवरांचे तसेच उपस्थितांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button