स्कॉलरशिप परीक्षेत सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूलचे सुयश; साक्षी गंगाकुमार सिंग इंग्रजी माध्यम विभागात तालुक्यात प्रथम
फेब्रुवारी-2024 मध्ये घेण्यात आलेल्या स्कॉलरशिप परीक्षेत सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मेडिअम स्कूलच्या इ. 5वीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करीत विद्यालयाची यशाची परंपरा कायम राखली.
यामध्ये कु.साक्षी गंगाकुमार सिंग हिने जिल्हा गुणवत्ता यादीत 30वा तर इंग्रजी माध्यम विभागात तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला तर ऋतुजा युवराज काशीद हिने जिल्हा गुणवत्ता यादीत 164वा क्रमांक मिळवित यश संपादन केले.