भारतीय स्त्री शक्ति संचलित, मैत्रीण कुटुंब सल्ला केंद्राची २० वर्षे यशस्वीरित्या पूर्ण.
* पिडीतांना न्याय मिळवून देणारे समुपदेशन केंद्र -

महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी संस्थेने सुरुवातीला “ महिला अन्याय निवारण समिती “ या नावाने
अन्यायग्रस्त महिलांचे अर्ज घेऊन त्याच्या निराकरणासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली. त्याचा खूप
चांगला परिणाम दिसून आला. अनेक पिडीत महिलांचे संसार पुन्हा नांदते करण्यात यश आले .केंद्रीय
समाजकल्याण मंडळ, दिल्ली अनुदानित भारतीय स्त्री शक्ति संचलित, मैत्रीण कुटुंब सल्ला केंद्र, शाखा
सांगोला हे १ जून २००४ पासून सांगोला येथे गेली २० वर्ष महिला पुरुष तसेच कौटुंबिक समस्येचे
निराकरण करण्याचे समाजाभिमुख काम करीत आहे.
या केंद्राला दिल्ली समाज कल्याण मंडळाची मान्यता
मिळवून देण्यासाठी भारतीय स्त्री शक्तीची खूप मोठी भूमिका आहे. भारतीय स्त्री शक्ती ही संघटना १९८८
पासून स्त्रीयांकरिता स्त्रियांची स्थापन झालेली संघटना भारतीय स्त्री शक्ती म्हणून महाराष्ट्रात मुंबई येथे सुरु
झाली आणि आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी व महाराष्ट्रा बाहेर अनेक राज्यामध्ये तिचा विस्तार झाला
आहे . समाज्याच्या सर्व स्तरातील महिलांचा विकास व समस्या निवारण यासाठी कार्यरत आहे सर्व
भारतात भरतीय स्त्री शक्तीच्या शाखा सुरु आहेत शिक्षण,आरोग्य आर्थिक, स्वावलंबन, समानता व
आत्मसन्मान या पंचसूत्रीच्या आधारे महिलांच्या समस्यांचे निराकरण केले जाते सध्या भारतीय स्त्री शक्ती
चे १० राज्यात ३० शाखांमध्ये कार्य सुरु असून ५ इतर संस्था सलग्न आहेत. तसेच १० समुपदेशन केंद्र सुरु
आहेत १२० स्वयमसायता बचत गट सुरु असून २०,००० कार्यकर्ते भारतीय स्त्री शक्तीचे कार्य बळकट
करण्यासाठी हातभार लावीत आहेत.सध्या भारतीय स्त्री शक्तीचे महिला खेळाडूंच्या अडचणी बाबत सर्वे
सुरु आहे.
भारतीय स्त्री शक्ती कडून महिला व मुलीनसाठी वेगवेगळे कार्यक्रम-,१] आर्थिक निम्न स्थरातील
मुलींच्या शिक्षणासाठी दत्तक पालक योजना २] किशोरी विकास – कुटुंब जीवन शिक्षण ३] बाल लैगिक
शोषण जाणीव जागृती कार्यक्रम उदा ;- महेश मांजरेकर यांचा “कोण नाय कोणच्या वरण भात लोणच्या “
या चित्रपटामध्ये लहान मुलांकडून अश्लील असे कृत्य करून घेण्यात आले होते त्या बाबतीतही भारतीय स्त्री
शक्ती ने आवाज उठविला होता. उपक्रम- १] कायदेविषयक जाणीव जागृती शिबीर २] कौटुंबिक
न्यायालयात मदत केंद्र ३] पाळणा घर ४] वाचक मंच व अभ्यास मंडळ. कार्यशाळा व चर्चा सत्रे यामध्ये –
१]स्त्री शिक्षण व रोजगार २] कुटुंब समुपदेशन व महिला विषयक कायदे ३] राष्ट्रीय कार्यशाळा घेणे ४]
दलित महिलांचे प्रश्न ५] समुपदेशकांसाठी वेगवेगळ्या विषयावर कार्यशाळा घेणे. बचत गट हा भारतीय
स्त्री शक्तीच्या अनेक उपक्रमापैकी एक उपक्रम आहे सध्या महिला खेळाडूंच्या अडचणी बाबत भारतीय स्त्री
शक्ती कडून सर्वे करण्याचे देखील काम सुरु आहे तसेच वेगवेगळ्या विषयावर कार्यशाळा व चर्चा सत्रे
घेतली जातात
भारतीय स्त्री शक्ति संचलित, मैत्रीण कुटुंब सल्ला केंद्रामध्ये महिला व पुरुषांच्या तक्रारी कोर्ट व
पोलीसस्टेशन बाहेर सामोपचाराने तडजोड करून १००% मिटविण्याचा प्रयत्न केला जातो. ग्रामीण
भागातील तसेच आजूबाजूच्या गावातील लोकांना या केंद्राची खूप मदत होत आहे. कोरोनासारख्या
महामारीच्या काळात ही मैत्रीण कुटुंब सल्ला केंद्राचे कामकाज फोन व्दारे व प्रत्यक्षरीत्या सुरु होते याचा
बऱ्याच लोकांना फायदा झाला आहे या केंद्रामध्ये २ समुपदेशक, १ सेविका कार्यरत आहेत. तसेच १
उपसमितीही कार्यरत आहे या उपसमिती मध्ये समाजातील तज्ञ मार्गदर्शक पोलिस निरीक्षक, पत्रकार,
संरक्षण अधिकारी, कायदेशीर सल्लागार मानसोउपचार तज्ञ, विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते इ तज्ञ
मंडळी असून केंद्रात येणाऱ्या अडचणीवर ते सल्ला देतात या केंदातील समुपदेशक प्रत्येक महिन्यात
गावागावात वाडीवस्तीवर जावून मेळावा घेऊन केंद्राची माहिती देतात. गेली २० वर्ष अनेक महिलांचे
संसार हा केंद्राने पुन्हा नांदते केले आहेत येथून गेलेले जोडपे जेव्हा पुन्हा प्रत्यक्ष भेटायला येतात व फोन करून संसार आनंदात चालला आहे असे सांगतात त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आपण
केलेल्या कामाची पोच पावती मिळाल्याचे आत्मिक समाधान मिळते.
केंद्रातर्फे वयात येणाऱ्या मुलींसाठी
१]कळी उमलताना,(लाभार्थी-१५,०००/-) २]युवक – युवतींसाठी विवाहपूर्व मार्गदर्शन,(लाभार्थी-
१८,०००/-) २]कायदेविषयक मार्गदर्शन यामध्ये – १] पोस्को,(लाभार्थी-५,०००/-) २] कौटुंबिक हिंसाचार
२००५,(लाभार्थी-१०,०००/-) ३] कामाच्या ठिकाणी होणारा लैगिक छळ,(लाभार्थी-६,०००/-)
४]स्व;संरक्षण,(लाभार्थी-२,०००/-) ५] ७/१२ मधीलमहिलांचेस्थान,,(लाभार्थी-२,५००/-
)६]मोबाईलचे.दुष्परिणाम,(लाभार्थी-५,०००/-३]आरोग्यविषयक शिबीरे,(लाभार्थी-(५,०००/-) ४] ओळख
स्पर्शाची,(लाभार्थी-(६,०००/-) ५]स्त्री – पुरुष समानता ,(लाभार्थी-२,०००/-) ६] पर्यावरण दिन,
,(लाभार्थी-१,५००/-)योगदिन ,(लाभार्थी-१,२००/-),जागतिक महिला दिन ,(लाभार्थी-२,५००/-)या
निमित्त वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात तसेच तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शनपर कार्यक्रम,यशस्वी जोडप्यांसाठी
नांदा सौख्य भरे कार्यक्रम, ,(लाभार्थी-(३५,०००/-) महिला व पुरुषांसाठी विविध जाणीव जागृती कार्यक्रम
घेऊन समाजाला एक नवीन दिशा दाखविण्याचे काम करत आहे. अचकदाणी माध्यमिक विद्यालयातील
विद्यार्थांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न देखील केंद्राच्या सहकार्याने सोडविण्यात आला आहे. या केंद्रात २००४
पासून आतापर्यत एकूण – ३,०७१ केसेस दाखल झाल्या आहेत आणि ९०% केसेस यशस्वी करण्यात यश
आले आहे. आजही केंद्राचे काम अविरतपणे सुरु आहे.