वर्ल्ड कपची ट्रॉफी कुठे ठेवणार? रोहीतच्या घरी की आणखी कुठे?
T20 World Cup 2024 Trophy : T20 वर्ल्ड कप 2024 जिंकल्यानंतर पाच दिवसांनी टीम इंडियाच मायदेशात आगमन झालय. टीम इंडिया भारतात दाखल झाल्यापासून खेळाडूंच्या हातात ही वर्ल्ड कपची ट्रॉफी दिसत आहे. ही ट्रॉफी कुठे ठेवणार? आयसीसीला परत द्यावी लागणार का? असे अनेक प्रश्न मनात आहेत.
दक्षिण आफ्रिकेला हरवून T20 वर्ल्ड कप जिंकून टीम इंडिया वर्ल्ड कप ट्रॉफीसह भारतात परतली आहे. टीम इंडियाने शनिवारी फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला धुळ चारली.
सर्वात महत्त्वाच म्हणजे वर्ल्ड कपची मुख्य ट्रॉफी खेळाडूंना दिलीच जात नाही. खरी ट्रॉफी आयसीसी नेहमीच आपल्याकडे ठेवते. रेप्लिक म्हणजे प्रतिकृती ट्रॉफी दिली जाते.