न्यू इंग्लिश स्कूलचा निसर्ग फुले शिष्यवृत्ती परीक्षेत महाराष्ट्र राज्यात प्रथम.; आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत सुद्धा उज्ज्वल यशाची परंपरा कायम
सांगोला शहरातील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनि कॅालेज या नामांकित प्रशालेतील इयत्ता पाचवी मधील निसर्ग चैतन्य फुले याने राज्यपातळीवर घेतल्या जाणाऱ्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती( स्कॅालरशिप) परीक्षेमध्ये २९८ पैकी २८८ गुण मिळवत महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला असून यामुळे न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनि कॅालेजच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
त्याचबरोबर आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत सुद्धा उज्ज्वल यशाची परंपरा कायम कायम राखली आहे. इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत कुमारी समृद्धी विष्णू माळी २५६ गुण जिल्हात २० वा क्रमांक तालुक्यात ५ वा क्रमांक, कुमारी संचिता संजय देशमुख २३४ गुण जिल्हात ६८ वा क्रमांक तालुक्यात १६ वी, कुमार गणेश शिवाजी आदलिंगे २१८ गुण जिल्हात १२९ वा तालुक्यात २३ वा, व कुमार विदाद जमीर शेख २१८ गुण जिल्हात १३५ वा तालुक्यात २५ वा या सर्व विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत निवड झाल्याबद्दल या गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार संस्थासचिव श्री विठ्ठलराव शिंदे सर व न्यू इंग्लिश स्कूल चे प्राचार्य प्रा.केशव माने यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
याप्रसंगी व्यासपीठावर सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक प्रा.दिपकराव खटकाळे,उपमुख्याध्यापक प्रा.संजय शिंगाडे पर्यवेक्षक तानाजी सूर्यगंध,दथरथ जाधव सर,तात्यासाहेब इमडे सर,सांस्कृतिक प्रमुख सौ स्मिता इंगोले मॅडम तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक आदी उपस्थित होते.
यावेळी पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेचे मार्गदर्शक शिक्षक निलोफर मुजावर मॅडम, सौ.कविता शिंदे मॅडम, श्री दिनेश बागुल सर, श्री किरण पवार सर तसेच आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचे मार्गदर्शक शिक्षक सौ.राणी आदलिंगे मॅडम,श्री अमोल पाकले सर,श्री अनिल पवार सर व श्री सागर वाघमारे यांचाही सन्मान यावेळी करण्यात आला.
प्रास्ताविक करताना सौ.कविता शिंदे मॅडम यांनी न्यू इंग्लिश स्कूल मध्ये वर्षभरात घेतल्या जाणार्या विविध स्पर्धा परीक्षांचा यावेळी आढावा मांडला. यानंतर आपले मनोगत व्यक्त करताना प्रमुख पाहुणे संस्था सचिव श्री विठ्ठलराव शिंदे सर म्हणाले की, जीवनात जर यश मिळवायचे असेल तर जिद्द आणि चिकाटी आवश्यक आहे. स्पर्धेच्या या युगात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षेत भाग घेवून यश प्राप्त केले पाहिजे. तुम्हा या ज्ञानमंदिरात जे शिक्षण घेत आहात ते उच्च दर्जाचे असून तुम्ही सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ या फार मोठी परंपरा असलेल्या संस्थेचे विद्यार्थी आहात ही भाग्याची गोष्ट आहे. तुमच्या या यशात प्रशाला,गुरूजन याचबरोबर तुमच्या पालकांचा ही मोठा वाटा आहे.
यावेळी पालक प्रतिनिधी श्री विष्णू माळी यांनी आपल्या मनोगतात बोलताना सांगितले की मी ही याच प्रशालेचा विद्यार्थी होतो व आज माझ्या मुलीने पण इथेच शिक्षण घेत जे यश मिळवले आहे याचा मला प्रचंड आनंद असून याचे सर्व श्रेय न्यू इंग्लिश स्कूल मधील गुरुजनांना जाते. विद्यार्थी घडविण्याचे काम खऱ्या अर्थाने या ठिकाणी होत असून स्पर्धेत टिकणारा विद्यार्थी या संकुलात सक्षम होत आहे याचा मला आनंद आहे.
सदरच्या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अमोल पाकले सर यांनी केले तर आभार अनिल पवार सर यांनी मानले.
सर्व गुणवंतांच्या या यशाबद्दल सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॅा.अनिकेत देशमुख,सचिव विठ्ठलराव शिंदे सर, संस्थासंचालक डॉ.अशोकराव शिंदे,प्रा.दीपकराव खटकाळे व प्रा.जयंतराव जानकर, यांनी त्याचे अभिनंदन करून त्याच्या भावी शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.