सावे येथील विठ्ठल शिवाजी गावडे यांचे दुःखद निधन.

. सांगोला तालुक्यातील सावे येथील गजराज ट्रान्सपोर्टचे सर्वेसर्वा व मालक विठ्ठल शिवाजी गावडे यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने सोमवार दिनांक 16 -9 -2024 रोजी दुःखद निधन झाले.
मृत्यू समयी त्यांचे वय 38 वर्षे होते. ते सांगली जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे संचालक होते.त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी ,दोन मुले, दोन भाऊ, भावजया, पुतणे असा मोठा परिवार आहे .विठ्ठल गावडे हे दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस व दिलदार मनमिळाऊ व्यक्तिमत्व स्वभावाचे होते. त्यांच्या अचानक जाण्याने सावे पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे.
त्यांच्यावर सांगली येथील अहिल्यादेवी हाउसिंग सोसायटी विठ्ठल मंदिरा शेजारी अभय नगर सांगली जवळील अमरधाम स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम बुधवार दिनांक 18 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी नऊ वाजता सांगली येथील अमरधाम स्मशानभूमी येथे होणार असल्याचे नातेवाईकानी सांगितले.