सांगोला शहरातील सौ.स्नेहल लऊळकर यांचे निधन

सांगोला(प्रतिनिधी):- सांगोला शहरातील सौ. स्नेहल अमोल लऊळकर यांचे अल्पशा आजाराने काल शनिवारी रात्री 7.30 वाजण्याच्या सुमारास सोलापुर येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले आहे. निधनासमयी त्यांचे वय 42 होते.
त्यांचा अंत्यविधी आज रविवार दि.7 जुलै 24 रोजी सकाळी 7.30 वाजता सांगोला शहरातील वाढेगाव नाका येथील स्मशानभूमीत होणार आहे. त्या श्री.अमोल लऊळकर यांच्या पत्नी होत.त्यांच्या पश्चात पती, मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.