सोशल मीडियावर डॉ.बाबासाहेब देशमुख यांची मोठी क्रेझ

सांगोला:- विधानसभा निवडणूकीची सांगोला विधानसभा मतदारसंघात जोरदार रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीचे रंग सुरू असतानाच सोशल मीडियावरही प्रचाराचं युद्ध रंगलं आहे. सोशल मीडियावरच्या या चर्चेत जे उमेदवार आघाडीवर आहेत त्यात सर्वात वरच्या स्थानावर शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉक्टर बाबासाहेब देशमुख आहेत.
सांगोला विधानसभा मतदारसंघ हा शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघाचे 55 वर्ष स्व. भाई डॉक्टर गणपतराव देशमुख यांनी प्रतिनिधित्व केले असून एक झेंडा, एक पक्ष, एक व्यक्ती अशी या मतदारसंघाची ओळख आहे. स्व. आबासाहेबांच्या पश्चात शेतकरी कामगार पक्षाकडून डॉ.बाबासाहेब देशमुख यांना या प्रतिष्ठेच्या मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.
आक्रमक भाषणशैली, शांत स्वभाव, संयमी नेतृत्व असणारे डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत पुरोगामी युवक संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष आहेत. आकर्षक व्यक्तिमत्व, भाषेवर प्रभुत्व आणि सांगोला तालुक्यातील जनसामान्यांचा विश्वास प्राप्त असल्याने डॉ.बाबासाहेब देशमुख यांची सोशल मीडियावर चांगलीच क्रेझ आहे. त्याच्या साधी राहणीमानाचे, अनेक ठिकाणी केलेल्या आंदोलनाचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून तरुणांचा त्याला प्रतिसाद मिळत आहे.
डॉ. भाई बाबासाहेब देशमुख यांच्या उमेदवारीमुळे तरुणांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. लहान मुलांपासून ते वयोवृद्ध नागरिकांपर्यंत डॉक्टर भाई बाबासाहेब देशमुख यांचे चाहते आहेत. अनेक वर्षापासून ते सांगोला मतदार संघात कार्यरत असून त्यांनी आपल्या निस्वार्थी सेवेतून सर्व समाजातील अनेक कुटुंबीय आपल्यासोबत जोडली आहेत. सध्या तालुक्यातील सर्वच भागात डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाविषयी सकारात्मक चर्चा असून अनेक तरुण,विद्यार्थी शेतकरी कामगार पक्षामध्ये काम करत असत.त्यामुळे या तरुण नेतृत्वाच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे राहणार असून त्यांना भरघोस मताने निवडून आणण्याचा निर्धारही सर्वांकडून व्यक्त केला जात आहे.