गुरुवर्य बापूसाहेब झपके चषकाचे मॅनिक स्पोर्ट्स अकॅडमी मुंबई मानकरी

सांगोला (प्रतिनिधी) सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या ४३ वा स्मृती समारोह २०२४ आयोजित राज्यस्तरीय पुरुषांच्या निमंत्रित बास्केटबॉल स्पर्धा ४२ वर्षांची समृद्ध परंपरा जोपासत दि.३० ऑगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत प्रचंड उत्साहात संपन्न झाल्या. अंतिम सामना अतिशय चुरशीने झाला. सांगोला महाविद्यालयाच्या इनडोअर स्टेडियम मध्ये खेळलेल्या अंतिम सामन्यात कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके स्मृती चषकाचे मानकरी मॅनिक स्पोर्ट्स अकॅडमी मुंबई ठरले असून या स्पर्धेतील उपविजेता म्हणून इंडियन जिमखाना मुंबई विजयी ठरला. या सामन्यातील तृतीय क्रमांक डेक्कन जिमखाना पुणे व चतुर्थ क्रमांक वाय.एम.सी.ए. घाटकोपर मुंबई यांनी पटकावला. सहाव्या क्रमांकापर्यंतच्या संघास रोख रक्कम व झपके कुटुंबीयांकडून कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके स्मृती चषक मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आल.पन्नास वर्षांपुढील खेळाडूंमध्ये झालेल्या अतिशय चुरशीच्या सामन्यात सांगलीच्या संघाने कोल्हापूरच्या संघावर एक गुणांनी मात केली. पन्नास वर्षांपुढील सर्व स्पर्धकांना गुरुवर्य बापूसाहेब झपके स्मृतीचिन्ह व मेडल देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.

तसेच उत्कृष्ट खेळाडू मेहराज शेख मॅनिक मुंबई,स्पर्धेतील बेस्ट शूटर ॠषभ काळभोर इंडियन जिमखाना मुंबई, उत्कृष्ट उदयोन्मुख खेळाडू शुभम यादव डेक्कन जिमखाना पुणे , तर सांगोला भागातील बास्केटबॉल गुणवंत खेळाडू ओमप्रकाश साळुंखे सांगोला विद्यामंदिर यांना कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके स्मृतिचषक देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर पारितोषिक वितरण समारंभाचे प्रमुख पाहुणे ऑलम्पिक विजेते स्वप्नील कुसाळे यांचे पिताश्री सुरेश कुसाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सांगोला पवन मोरे, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, सांगोला तालुका उच्च शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड, उद्योगपती सिद्धार्थ झपके, एम शफी,विलास क्षीरसागर, सांगोला तालुका बास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष सुहास होनराव,उद्योगपती ज्ञानेश्वर तेली, मंगेश म्हमाणे,नागेश तेली, बास्केटबॉल नियोजन समितीचे सचिव प्रशांत मस्के, वृत संपादक अजित संगवी, गौरव कुसाळे,सागर सावंत,प्रवीण तडोळी,सांगोला महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य सुरेश भोसले, सांगोला विद्यामंदिरचे प्राचार्य अमोल गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

सुरुवातीला सांगोला विद्यामंदिर येथे संस्थापक अध्यक्ष गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार समर्पित करण्यात आला.

यावेळी पारितोषिक वितरण समारंभामध्ये बोलताना स्वप्नील कुसाळे यांचे पिताश्री सुरेश कुसाळे म्हणाले की कै.गुरुवर्य बापूसाहेब झपके यांनी स्थापन केलेल्या संस्थेमध्ये विनयता, नम्रता, आपुलकी अशा गुणांचा समन्वय मला पाहायला मिळाला,ज्यांच्या विचारांच्या प्रेरणेतून हे कार्य सातत्याने पुढे जात आहे, अशा कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. आम्ही नेहमी याच रस्त्यातून पंढरपूरला जातो आज खऱ्या अर्थाने सांगोल्याचे वैभव आम्हाला पाहायला मिळाले, बापूसाहेबांनी निर्माण केलेले वैभव पाहायला मिळाले हे मी माझे भाग्य समजतो. स्वप्निल कुसाळे कशा पद्धतीने ऑलम्पिक पर्यंत पोहोचला याचा विस्तृत वृत्तांत त्यांनी मांडला, खडतर परिस्थितीत ही एक पिता आपल्या मुलाच्या पाठीमागे उभा राहिला तर त्याच्या जगण्याला कशा पद्धतीने कलाटणी मिळू शकते याचा आदर्श त्यांनी उपस्थितांसमोर मांडला.

या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून प्राचार्य अमोल गायकवाड यांनी कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांनी आपला विद्यार्थी सर्वांगीण बनवा यासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्याच विचारांचा वारसा संस्था अध्यक्ष प्रबुद्धचंद्र झपके व सर्व संस्था सदस्य जोपासत, त्यांचा गुणात्मक व रचनात्मक विकास प्रमाण मानून खेळाला महत्त्व देत गेली ४२ वर्ष या स्पर्धा संपन्न होत आहेत असे सांगत उपस्थितांचे स्वागत केले.कार्यक्रमासाठी सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, खजिनदार शंकरराव सावंत, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, संस्था कार्यकारिणी सदस्य विश्वेश झपके व संस्था सदस्य, गावातील प्रतिष्ठित मान्यवर, क्रीडा प्रेमी उपस्थित होते. सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व सदस्य, राज्यभरातून आलेले सर्व निमंत्रित खेळाडू त्यांचे मार्गदर्शक शिक्षक पत्रकार बांधव यांच्यासह विद्यामंदिर परिवारातील प्राचार्य,मुख्याध्यापक,उपमुख्याध्याक पर्यवेक्षक सर्व शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते सदरच्या क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी बास्केटबॉल नियोजन समितीचे सचिव प्रशांत मस्के, सर्व पदाधिकारी,सामना समिती सर्व पदाधिकारी, विद्यामंदिर परिवारातील सर्व प्रशासकीय वर्ग शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष योगदान दिले.पंच सत्कार निवेदन प्रशांत मस्के यांनी केले. पारितोषिक समारंभाचे निवेदन मिलिंद फाळके यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. धनाजी चव्हाण यांनी केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button