स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेत विविध प्रशिक्षणांचे आयोजन

ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार, राज्य सरकार व बँक ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींना मोफत व्यवसाय प्रशिक्षण देवून उद्योग व्यवसायाकडे वळविण्याच्या हेतूने स्टार स्वंयरोजगर प्रशिक्षण संस्था सोलापूर यांच्या मार्फत मोफत विविध प्रशिक्षणांचे आयोजन करण्यात आले असून, ग्रामीण भागातील युवक युवतींनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे संचालक दीपक वाडेवाले यांनी केले आहे.

स्टार स्वंयरोजगर प्रशिक्षण संस्था सोलापूर यांच्या मार्फत ह्या वर्षी जवळ जवळ 40 प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले असून, सर्व प्रशिक्षण मोफत निवासी स्वरुपाचे असणार आहेत. यामध्ये शिवणकला, ब्युटीपार्लर, ज्वेलरी बनविणे, फास्ट फूड, दुचाकी दुरुस्ती, मोबाईल दुरुस्ती, शेळीपालन, दुग्धव्यवसाय व गांडूळखतनिर्मिती, रेशीम उद्योग अशा विविध 61 प्रकारचे व्यवसाय प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच ह्या सर्व प्रशिक्षणामध्ये उद्योजकता विकास, आर्थिक साक्षरता, बँकिंग तसेच प्रकल्प अहवाल या विषयावर मार्गदर्शन केले जाते. सर्व प्रशिक्षणासाठी लागणारे साहित्य, प्रशिक्षणार्थ्यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था पुर्णपणे मोफत आहे. या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थी हा सोलापुर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील असावा व त्याचे वय 18 वर्ष पुर्ण व 45 वर्षाच्या आतील असावे.

जिल्ह्यातील सर्व ग्रामीण भागातील युवक युवतींनी ह्या संधीचा लाभ घेवून स्वतचा व्यवसाय सुरू करावा व बेरोजगारी कमी करून देशाच्या आर्थिक वाटचालीसाठी हातभार लावावा असे अवाहनही संस्थेचे संचालक श्री वाडेवाले यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ९२७२२०७१११ या भ्रमणध्वनीवर संपर्क करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button