sangolahealth

सांगोला ग्रामीण रुग्णालयाला मिळाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा – आमदार शहाजीबापू पाटील

HTML img Tag Simply Easy Learning    

सांगोला ग्रामीण रुग्णालयाला मिळाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा – आमदार शहाजीबापू पाटील

उपजिल्हा रुग्णालयात ५० खाटांसह आरोग्याच्या परिपूर्ण सुविधा उपलब्ध होणार

सांगोला (तालुका प्रतिनिधी): शहरातील सांगोला ग्रामीण रुग्णालयाची श्रेणीवाढ करून उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात यावा, यासाठी आमदार शहाजीबापू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांच्याकडे उपजिल्हा रुग्णालयाच्या मंजुरीसाठी सातत्याने गाठीभेटी घेऊन पाठपुरावा केला. या पाठपुराव्याला यश आले असून सांगोला ग्रामीण रुग्णालयाचे ३० खाटांवरून ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये एक विशेष बाब म्हणून श्रेणीवर्धन करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे नागरिकांना तात्काळ व परिपूर्ण आरोग्यसेवा मिळण्यास मदत होणार असल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.

सांगोला येथे ३० बेडचे ग्रामीण रुग्णालय असून लोकसंख्येचे विचार करता रुग्णांना मिळणारी आरोग्य सुविधा लोकसंख्येच्या प्रमाणात कमी पडत होती. त्यामुळे सांगोला ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला आरोग्याच्या परिपूर्ण सुविधा देण्याच्या दृष्टीने आमदार शहाजीबापू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांच्याकडे सांगोला ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्याच्या मंजुरीसाठी सातत्याने गाठीभेटी घेऊन पाठपुरावा केला. या प्रयत्नाला यश आले असून सार्वजनिक आरोग्य विभागाने सांगोला ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा दिला आहे. सध्या सांगोला ग्रामीण रुग्णालयात ३० खाटांची सुविधा उपलब्ध असून आता उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाला मिळाल्याने ५० खाटांची सुविधा उपलब्ध होणार आहे.

सांगोला तालुक्यातील सर्वाधिक महत्त्वाकांक्षी ठरणाऱ्या उपजिल्हा रुग्णालयाच्या मंजुरीसाठी आमदार शहाजीबापू पाटील यांचा राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू होता. त्यास यश आले असून राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे अवर सचिव अरविंद मोरे यांनी याबाबतचा शासनादेश काढला आहे. सदर ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी जागा उपलब्ध करुन तेथे बांधकाम व पदनिर्मिती करण्याबाबत स्वतंत्रपणे कार्यवाही करण्यात येणार आहे. २५ सप्टेंबर २०१९ मधील तरतूदीनुसार उपजिल्हा रुग्णालयाच्या बांधकामाचे अंदाजपत्रक व आराखडे सादर करण्यात येणार आहेत.

 

उपजिल्हा रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण झाल्यावर रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी शस्त्रक्रिया, स्त्री व प्रस्तुती रोगतज्ञ, बालरोगतज्ञ, अस्थीरोग तज्ञ, नेत्र शल्यचिकीत्सक, दंत चिकित्सक, वैद्यकीय अधिकारी अधिपरिचारिका, प्रयोगशाळा शास्त्रज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञ, इसीजी तंत्रज्ञ अशी नवीन पदे भरण्यात येणार आहेत. अद्ययावत आयसीयू, ऑपरेशन थिएटर, प्रशासकीय विभाग, प्रयोगशाळा, कॅटीन, रूग्णालयाच्या परिसरात बायोमेडिकल वेस्ट तसेच विशेष अद्ययावत उपकरणे व यंत्रसामुग्री पुरविली जाणार आहे. या उपजिल्हा रूग्णालयामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना येथे विविध वैद्यकीय सेवा उपलब्ध होणार आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!