महाराष्ट्र
सांगोला विद्यामंदिरमध्ये गीतगायन स्पर्धा उत्साहात संपन्न

सांगोला (प्रतिनिधी) सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला संचलित सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेज सांगोला येथे रवींद्रनाथ टागोर पुण्यतिथीनिमित्त इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची गीतगायन स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यावेळी व्यासपीठावर सांगोला विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य अमोल गायकवाड, उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे, पर्यवेक्षक उत्तम सरगर,ज्येष्ठ शिक्षक चिंतामणी देशपांडे,वा:ड्मय विभाग प्रमुख प्रा.शिवशंकर तटाळे, उत्सव विभाग प्रमुख प्रा.तानसिंग माळी उपस्थित होते.
या स्पर्धेत भावगीत, भक्तीगीत, देशभक्तीगीत व लोकगीत या प्रकारात ५२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
याप्रसंगी प्राचार्य अमोल गायकवाड यांनी मार्गदर्शन करताना प्रसिद्ध गायक आपल्यामध्ये दडलेले असून आपल्या कलेस वाव मिळण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे असे सांगत विद्यार्थ्यांना गीत गायनासाठी प्रेरित केले.
या स्पर्धेमध्ये भावगीत या प्रकारामध्ये कु.टाकळे ऋतुजा तानाजी प्रथम क्रमांक,कु.येलपले प्रणाली दत्तात्रय द्वितीय क्रमांक ,कु. सोनंदकर सिद्धी संतोष तृतीय क्रमांक, भक्तीगीत या प्रकारामध्ये कु.दबडे संचिता तानाजी प्रथम क्रमांक,कु.सुतार सिद्धेश्वरी प्रमोद द्वितीय क्रमांक ,कु.टाकळे ऋतुजा तानाजी तृतीय क्रमांक, देशभक्तीपर गीतामध्ये कु.जगधने साक्षी नितीन प्रथम क्रमांक ,कु.सोनार पूनम आनंद द्वितीय क्रमांक, कु.लोखंडे प्रणिती आनंदा व कुमार हजारे महेश दगडू तृतीय क्रमांक लोकगीत या प्रकारांमध्ये कु.दबडे संचिता तानाजी प्रथम क्रमांक, कु.जाधव स्नेहा संतोष द्वितीय क्रमांक,कु.इंगोले संचिता संजय हिने तृतीय क्रमांक मिळविला.
या स्पर्धेसाठी परीक्षक प्रा.सुवर्णा बेहेरे, प्रा.माधुरी केदार, प्रा.स्नेहांकिता डाके यांनी परीक्षण केले. या कार्यक्रमासाठी ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थी शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.शिवशंकर तटाळे यांनी केले.सूत्रसंचालन प्रा.सुऱ्याबा आलदर यांनी केले तर प्रा.राधा विटे यांनी आभार प्रदर्शन केले.



