*सांगोला तहसीलच्या वतीने नाझऱ्यात विविध दाखल्यांसाठीच्या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*

नाझरा (वार्ताहर):- नवीन शासन आपल्या दारी या अनोख्या योजनेअंतर्गत नाझरा मंडल परिसरातील निराधार लोकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी त्याचबरोबर इतर विविध दाखल्यांसाठी सांगोला तहसील कार्यालयाच्या वतीने तहसीलदार संतोष कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली नाझरा विद्यामंदिर प्रशालेत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात निराधार लोकांसाठी असणाऱ्या उत्पन्न दाखला तसेच जातीचा दाखला,रेशन कार्ड नाव कमी जास्त करणे,रहिवाशी दाखला असे विविध प्रकारच्या दाखल्यांसाठी 68 लोकांनी आपले प्रस्ताव दाखल केले आहेत.
या शिबिराचे उद्घाटन नायब तहसीलदार संतोष साळुंखे,नाझरा मंडल अधिकारी हरिश्चंद्र जाधव,नाझरा विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य बिभीषण माने, पर्यवेक्षक मधुकर धायगुडे, मुख्याध्यापिका मंगल पाटील,तलाठी किरण बाडीवाले,उमेश सूर्यवंशी, योग्यता खताळ,अपर्णा मोरे, एस.के. जाधव,लिंगराज आलदर,रोहित वासवडे,पोलीस पाटील लखन बनसोडे यांच्यासह विविध गावातून आलेल्या ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
विशेष शिबिरासाठी नाझरा मंडल परिसरातून असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी महा कृषी सेवा केंद्राचे बालाजी पालसांडे, नितीन टिंगरे,उत्तम साठे,तिप्पन्ना खांडेकर,समाधान आदाटे,ओंकार यादव,शरद कोळवले,नितीन धांडोरे, नाझरा मंडल मधील सर्व गावातील कोतवाल आदींनी विशेष परिश्रम घेत सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. काही दाखल्यांचे तात्काळ वाटप करण्यात आल्याने ग्रामस्थांकडून याबाबत समाधान व्यक्त केले.