कै.बाईसाहेब झपके यांच्या २५ व्या.स्मृतीदिनानिमित्त समाधी दर्शन, प्रतिमापूजन व व्याख्यान; वेळीच उपचाराने कर्करोगाची वाढ रोखणे शक्य – डॉ.प्रकाश बनसोडे

सांगोला (प्रतिनिधी) सांगोला नगरीच्या पहिल्या महिला नगराध्यक्षा व सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला माजी अध्यक्षा कै.शोभनतारा उर्फ बाईसाहेब चंद्रशेखर झपके यांच्या २५ स्मृतीदिनानिमित्त समाधीस्थळी समाधी दर्शन व सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला येथे सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांचे हस्ते प्रतिमा पूजन संपन्न झाले.यावेळी संस्थापक अध्यक्ष कै.गुरूवर्य बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास पुष्पहार समर्पित करण्यात आला.यावेळी प्रास्ताविकातून प्रा.धनाजी चव्हाण यांनी कै.बाईसाहेब झपके यांच्या शैक्षणिक, सामाजिक कार्याची माहिती दिली. यावेळी संस्थासचिव मल्लिकार्जुन घोंगडे,संस्था कार्यकारणी सदस्य चंद्रशेखर अंकलगी, प्राचार्य गंगाधर घोंगडे, उपमुख्याध्यापक लक्ष्मण विधाते, उपप्राचार्य शहीदा सय्यद, पर्यवेक्षक अजय बारबोले, पोपटकेदार, बिभीषण माने यांच्यासह शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
तसेच दु.३ वा. सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला व लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्त्रियांमधील कर्करोग कारणे लक्षणे व प्रतिबंधात्मक उपाय या व्याख्यानामध्ये व्याख्याते डॉ. प्रकाश बनसोडे यांनी कर्करोगासाठी केवळ सतर्कता, प्रतिबंध आणि उपलब्ध उपचाराने कर्करोगाचा प्रादुर्भाव, वाढ, पुनरावृत्ती, शरीरांतर्गत प्रसार रोखता येऊ शकतो आणि रुग्णाचे जीवनमान वाढवता येऊ शकते. यासाठी एक गोष्ट मात्र खरी की सुरुवातीच्या काळात वेळीच निदान झाले,योग्य उपाययोजना व उपचार मिळाले तर कर्करोग बरा होऊ शकतो. नियंत्रणात राहू शकतो.असे सांगत कर्करोग प्रकार,लक्षणे व उपाय यासंदर्भात मौलिक माहिती दिली.व कर्करोगासंदर्भात शंकाचे निरसन केले.
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी प्रांतपाल ला.प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, सांगोला विद्यामंदिरचे प्राचार्य गंगाधर घोंगडे, सांगोला लायन्स क्लबचे अध्यक्ष ला.उन्मेश आटपाडीकर उपस्थित होते.या व्याख्यानासाठी विद्यामंदिर परिवार ( सांगोला,नाझरा,कोळा )
शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या, कार्यक्रमाच्या प्रस्ताविकामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांनी बाईसाहेबांच्या कार्याची माहिती देत. त्यांच्या स्मृती दिनानिमित्त आरोग्याच्या दृष्टीने कर्करोगासंदर्भात महत्त्वपूर्ण व्याख्यान व कर्करोग तपासणी शिबिरा संदर्भात माहिती देत आयोजनासंदर्भातील हेतू स्पष्ट केला.
प्रतिमापूजन व समाधी दर्शन कार्यक्रम सूत्रसंचालन उन्मेश आटपाडीकर यांनी तर व्याख्यान कार्यक्रम सूत्रसंचालन संध्या तेली यांनी केले तर आभार ला.शुभांगी घोंगडे यांनी केले.
कै.बाईसाहेब झपके यांच्या २५ व्या स्मृतीदिनानिमित्त सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला, लायन्स क्लब ऑफ सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने व लुपीन लिमिटेड यांच्या सहकार्याने ५ नोव्हेंबर २०२३ रोजी विद्यामंदिर परिवारातील महिला शिक्षकांसाठी सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज सांगोला येथे मोफत कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.