आषाढी एकादशीसाठी खास बंगळूरहून पोशाख, सावळ्या विठुरायाचे रुप अधिकच खुलणार
सांगोला :- यंदा 17 जुलै रोजी आषाढी एकादशीचा महासोहळा होत असून यासाठी 18 ते 20 लाख भाविक पंढरीच्या समीप पोहचली आहेत.आषाढी एकादशी दिवशी लाडक्या विठुराया आणि रुक्मिणी मातेलाही खास पोशाख बेंगलोर येथून बनविण्यात आला आहे. विठुरायाला भगव्या रंगाची मखमली अंगी बनविण्यात आली असून यावर संपूर्णपणे हाताने भरजरीत कलाकुसर करण्यात आली आहे.
देवाला बंगलोरी सिल्कचे अतिशय मुलायम असे सोवळे आणण्यात आले असून त्यावर भगव्या रंगाचीच मखमली शेला परिधान केला जाणार आहे.रुक्मिणीमातेलाही अतिशय उंची भरजरी सिल्कची नऊवारी साडी खास बनवून बेंगलोर येथून आणण्यात आल्याचे मंदिर समिती सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.आषाढीला मंदिर समितीकडून होणाऱ्या देवाच्या नित्यपूजेत हा खास पोशाख परिधान करण्यात येणार आहे.
आषाढी सोहळयाला होणाऱ्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्र्यांच्या कडून खास पोशाख देखील आणला जाणार आहे.महापूजेनंतर तो पोशाख देवाच्या नागावर परिधान केला जाणारे आहेवारकऱ्यांना लवकरात लवकर दर्शन मिळावे यासाठी आषाढीला व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्यात आले आहे.